कुमारी अनुष्का सुतार पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पंधरावी.. — पुणे,सोलापूर,सातारा,जिल्ह्यातुन अनेक सुतार समाजाच्या वतीने अनुष्काला फोन द्वारे दिल्या शुभेच्छा!

  बाळासाहेब सुतार 

नीरा नरशिंगपूर प्रतिनिधी

         इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थिनी कु.अनुष्का गणेश सुतार या विद्यार्थिनीने फेब्रुवारी 2024 मध्ये झालेल्या पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 298 पैकी 270 गुण मिळवून राज्यात पंधरावा क्रमांक मिळवला आहे.

            या वर्षी घेण्यात आलेल्या मंथन परीक्षेत जिल्ह्यात चौथा क्रमांक तसेच प्रेरणा शिष्यवृत्ती परीक्षा मंगळवेढा तालुक्यात दुसरा क्रमांक,त्याचबरोबर मंगळवेढा टॅलेंट सर्च म्हणजेच गुरुकुल परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक,तसेच राज्यस्तरीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात १५ वा क्रमांक मिळवल्याबद्दल सर्वांकडून तिचे कौतुक होत आहे.

      यावर्षीच्या अनुष्काने तिच्या यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षकांचे,संस्थाध्यक्ष ऍड.सुजितबापू कदम,उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम,संस्थेच्या अडमिनिस्ट्रेटर डॉ.मिनाक्षी कदम,सचिव डॉ.प्रियदर्शिनी महाडिक,संचालिका व शिवशंभो पतसंस्थेच्या अध्यक्षा संस्थापिका प्रा.तेजस्विनी कदम,सहसचिव श्रीधर भोसले,खजिनदार राम नेहरवे,संचालक यतीराज वाकळे,संचालक ऍड.शिवाजी पाटील,प्राचार्य रवींद्र काशीद,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,अनुष्काचे कुटुंब,जिल्हा पत्रकार संघ,तसेच विश्वकर्मा पांचाळ सुतार सामाजिक संस्था सोलापूर या सर्वांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.