0 ते 10 वर्षाच्या वयात आई-वडील,बहीण-भाऊ,आजी-आजोबा,काका-काकू,मावशी आणि शिक्षक किंवा शिक्षीकेच्या त्याचप्रमाणे लहान मित्र – मैत्रिणीच्या सानिध्यात आणि सूसंस्कारात वाढून आपल्याला निसर्गाने प्रदान केलेल्या……….
“निरागसत्वाला”….
अविष्कारीत करण्याची सुवर्णसंधी लाभलेली असते.
कारण याच काळात कोऱ्या आणि कोवळ्या मेंदूत जे कू किंवा सू संस्कार भराल तेच मानववंश आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या तसेच वैज्ञानिकदृष्ट्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून असतात.
म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून वयाच्या 6 ते 14 वर्षापर्यंतच्या प्रत्येक बालकाला शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे घटनात्मक तरतूद करून केलेले आहे.
कदाचित यासाठीच तर घटनाकारांनी शिक्षकांना सर्वात जास्त पगार देण्याची तरतुद केली आहे की जेणेकरून,त्यांनी आचरणातून नैतिकता सिद्ध करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श घडवावा.जेणेकरून विद्यार्थी त्याचे अनुकरण करून भावी समाज आणि देश सुसंस्कृत घडवतील.
परंतू हे शिक्षण आणि सुसंस्कार नैसर्गिक तत्वज्ञानावर आधारित आणि विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे असले पाहिजे.कोणत्याही धार्मिक कर्मकांडावर किंवा अंधश्रद्धेवर आधारित नको.
तेंव्हाच….
माणूस….
बनण्याचा पाया मजबूत होईल….
परंतू इथे मात्र आम्ही देशाच्या संविधान निर्मितीच्या 75 वर्षात प्रत्येक भारतीय आपापल्या धर्माच्या कर्मकांडावर आधारित मुलांवर संस्कार केल्यामुळे आमची मुलं सदविचारी व डोळस न बनल्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या आमचा देश जगाच्या तुलनेत मागे आहे..
11 ते 20 वर्षे कुमार वयाच्या काळात शिक्षणातून आणि आई – वडिलांच्या व मित्रांच्या सानिध्यातून स्वतःच्या विचाराचा पाया मजबूत करण्याची सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी निसर्गनियमांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खऱ्या शिक्षणाच्या व्याख्येनुसार तशा शिक्षणातून….
नैतिकता व अनैतिकता…
यातील फरक ओळखून नैतिकतेलाच अविष्कारीत करण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे.या सुसंस्काराची पायाभरणी याच काळात हळूहळू झाली पाहिजे. यामध्ये आई – वडील आणि आपले गुरु असलेले शिक्षक किंवा शिक्षिका तसेच सर्व वडीलधारी मंडळी यांच्या आज्ञाधारकात राहूनच आपण घडलो पाहिजे.त्यासाठी शिक्षक आणि आई वडिलांनी विशेष लक्ष दिलेच पाहिजे. शिवाय सर्वात महत्वाचे स्वतः पाल्यानेच हे सर्व स्वतः स्वीकारायला पाहिजे.तेंव्हाच खऱ्या अर्थाने भावी क उज्वल भारत घडण्यासाठी मदत होईल.
परंतू आज घडीला आई – वडील, शिक्षक, मित्र, पुस्तक यांची जागा मोबाईल आणि इंटरनेटने घेतल्यामुळे या वयातील कुमारपिढी आता सुमार होऊन बसली आहे. यांच्यापुढे सर्वच हतबल झालेले आहेत.त्यामुळे उद्याचा भावी देश किंवा समाज सोडा स्वतःच्या घरालाही भविष्य राहीलेले नाही…
टीप :- यापुढील याच पोस्टचा उत्तरार्ध उद्याच्या भागात असेल….
संविधान जागृतीचा लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689