गडचिरोली, दि .१०: पुढिल ७२ तास जिल्हयात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. जिल्हाधिकारी संजय मीना यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना तातडीने मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून आव्हान करण्यात येत आहे की पुढिल बहात्तर तास मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे कोणीही विनाकारण बाहेर पडू नये. मुसळधार पावसा दरम्यान विविध ठिकाणी नाले पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.