पुणे जिल्हा प्रतिनिधी
यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्यांच चेहर्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण शेतकर्यांनी भात बियाणांची पेरणी केली होती. काही काळ दडी मारलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने पेरलेल्या बियाणाने चांगल्या प्रकारे उगवले गेले.आता ही रोपे लागवडीसाठी शेतकर्यांनी लगबग सुरू केली आहे. खडकवासला ग्रामीण भागात भात लागवड मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी सुरू केली आहे. डोणजे येथील पोळेकर वस्तीतील विठ्ठल पोळेकर यांनी भात लागवड सुरू केली आहे.या भागात पावसाचे प्रमाण चांगले आहे, त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणार्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा देखील वाढला आहे. या भागातील गोर्हे, डोणजे, खानापूर, मालखेड, ओसाडे तसेच सोनापूर या भागात देखील भात लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.