पुणे जिल्हा प्रतिनिधी

मुठा खोर्यातील वातुंडे गावचे रहिवासी असलेल्या हभप बाळकृष्ण शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्राथमिक शाळा शिक्षिका लक्ष्मी शिंदे या दाम्पत्याने आपली पांडुरंगा प्रती असलेली भक्ती अनोख्या पद्धतीने व्यक्त केली. आपल्या शेतात १२०×६०फूट एवढी भव्य अशी भात रोपातून पांडुरंगाची सजीव प्रतिकृती तयार करून त्याचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडविले आहे. पंढरीची वारी वारी करता आली नाही ही खंत वाटू न देता शिंदे दाम्पत्यांनी साक्षात पांडुरंगालाच आपल्या शेतात उभे केल्याची भावना तेथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहे.त्यांच्या या भक्तीमय कलेची दखल विविध माध्यमांनी घेतली असून या भात रोपांनी सगुण साकार रूपात प्रकटलेल्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी विविध गावातील भाविक वातुंडे येथे येत आहेत. यावेळी बोलताना बाळकृष्ण शिंदे म्हणाले की, देवाला फक्त भक्तीने जवळ करता येते बाकी सगळ खोटं आहे. म्हणून तर सावता माळी त्याला भाजीत पाहतात, जनाबाई त्याला शेणाच्या गोवर्यांमध्ये, मीराबाई विषाच्या पेल्यात, कबीर महाराज शेल्यामध्ये, इश्वर आपल्या कायम जवळ आहे फक्त आपण तो पाहिला पाहिजे याच भावनेने आम्ही ही जीवंत प्रतिकृती आपल्या शेतात तयार करण्याचा संकल्प केला. त्याला ग्रामस्थ व निसर्गाने मोलाची साथ दिल्याने आम्हाला साक्षात भगवंताने दर्शन दिल्याने खुप आनंद होत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com