अकोट प्रतिनिधी

 

      भूतलावर दोनच तिर्थक्षेत्र आहेत काशी व दुसरे श्री क्षेत्र पंढरपूर, जी अविनाशी आहेत. म्हणून प्रत्येक हिंदू आपल्या समग्र जिवनात एकदा तरी या ठीकाणी नतमस्तक होण्याची आशा बाळगतो.

श्रधा अन भक्ती चा सुरेख मेळ म्हणजे आषाढी व कार्तिकी एकादशी ची पंढरपूरची वारी. संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाजात भागवत धर्माचा प्रचार, प्रसार करण्यासाठी नामदिंडीची, म्हणजेच पंढरीची वारी सुरू केली. व वारक-यांनी तीच परंपरा, वारसा चालु ठेवली व पुढे अनंत काळापर्यंत चालु राहील. विठुरायाच्या नाम गजरात निघणाऱ्या वारीला नामदिंडीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

   भगवंताच्या भेटीची आस लागली असल्याने वारकरी संसार, प्रपंच यात न अडकता उन, पाऊस तसेच प्रतीकुल परिस्थितीशी सामना करीत मार्गक्रमण करीत असतो.

असेच एक नंदिपेठ अकोट येथील वयोवृद्ध वारकरी श्री श्रीवंत नारायण पिंपळे त्यांचे वय जरी ८० वर्ष असेल परंतू अजूनही दिंडीतील तरुणांच्या दोन पाऊले पुढे असलेले हे विनेकरी आहेत. सध्या श्री. गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव च्या दिंडींत विनेकरी असलेले श्री. पिंपळे हे ३६ वर्षापासुन, कोरोना काळ वगळता निरंतर वारी सुरू आहे. पादुका संस्थान मुंडगाव कडुन कोणत्याही मानापानाची अपेक्षा न ठेवता हे आजोबा श्रींच्या सेवेत तत्पर आहेत.

पु. ल. देशपांडे म्हणतात ना.. मला विठ्ठलापेक्षा, त्याच्या पुढे लोटांगण घालणाऱ्या वारक-यांच्या दर्शनाचीच अधिक ओढ वाटते.असेच काही श्री पिंपळे आजोबा व त्यांच्या सारखे लाखो वारकरी यांच्या समोर आपसूकच कर जोडल्या जातात.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com