ऋषी सहारे

संपादक

 

       आरमोरी तालुक्यात आणि आरमोरी शहारालगत सद्या वाघाच्या भीतीने सर्वत्र भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे. आरमोरी अरसोडा येथील नलुबाई जागडे,तर आरमोरी बर्डी येथील रहिवासी वासुदेव मेश्राम हे आपल्या शेतात शेती कामाकरिता गेले असता वाघाने या दोघांच्या नरडीचा घोट घेतला.  या घटनेने परिसरातील शेतकरी वर्गात अतिशय भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे शेतकरी वर्ग आता आपल्या शेतात जाण्यास घाबरत आहेत तर दुसरीकडे बरेचसे शेतकरी हे वाघाच्या भीतीने या वर्षी आपली शेती ही पडीतच ठेवली आहे. यामुळे रानटी डुकरे ही रात्रीच्या वेळी शेतीतील शेतपिकाची फार मोठी नुष्कान करीत आहेत.

           आरमोरी पासून 3 किलोमीटर अंतरावर, ब्रम्हपुरी रोडवर असलेला हॉटेल किनारा समोरील असलेली शेतीत श्री. मारोती निवृत्ती लाड यांनी 8 एकर शेती किरायाने घेऊन 6 एकरात उसाचा पीक, एक एकरात धान व एक एकरात जनावरांसाठी चारा अशी पिकाची लागवत केली आहे.  त्यातील अंदाजे 2 एकराच्या जवळपास अंदाजे किंमत 2 लक्ष किमतीचा उसाच्या पिकाची रानटी डुकरांनी नासधूस करून संपूर्ण पीक जमीनदोस्त केला. सदर शेतकरी हा वाघाच्या भीतीने रात्रीच्या वेळी शेतीत जागलीला जाणे बंद केले होते. रानटी डुकरांना दिनांक 7, 8, 9, जुलै या तीन दिवसात अंदाजे 2 एकर व 2 लक्ष किमतीचे ऊस पिकाची संपूर्ण नासधूस केली. 

        तरी नुसकाग्रस्त पिकाची  वनविभागातर्फे पाहणी करून नुष्कान भरपाई देण्यात यावी , अशी मागणी मारोती निवृत्ती लाड यांनी केली आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com