वणी : परशुराम पोटे

 

तालुक्यातील कोलगाव, मुंगोली उपक्षेत्रा अंतर्गत वेकोली कडून निर्माण झालेल्या समस्या बाबत ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कोलगाव चेक पोस्ट रस्त्यावर माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पावडे, विजय गारघाटे, सरपंच ज्योति माथुलकर, मंगला भटवलकर, गणेश जेनेकर, निलेश पिंपळकर, सरपंच गणेश रोडे, याचेसह शेकडो गावकरी उपस्थित होते.

या रस्ता रोको आंदोलना दरम्यान वेकोली प्रशासनाचे अधिकारी एच.एभ. सोलुखे, उपक्षेत्रीय प्रबंधक, आर.डी खान, प्रबंधक मुंगोली, ओसिएम देवराजन यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. कोलगाव चेक पोस्ट जवळील रस्ता दोन भागात करणे, साखरा ते मुंगोली पुला पर्यंतचा रस्ता दुरुस्त करणे, मुंगोली ते शिवणी रस्ता ७०० मिटर स्टोन डस्ट करण्या बाबत, चिखली टाकळी पर्यंत बारीक चुरी टाकुन रस्ता दुरुस्त करणे, मुंगोली जूगाद ओ.बि. देण्या बाबत, ईत्यादी मुख्य मागण्या संदर्भात वेकोली प्रशासनाने आंदोलनाची जबाबदारी स्वीकारून संपूर्ण समस्यांचे निराकरण करणार असल्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने २५ जुलै पर्यंत तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आता वेकोली प्रशासनाकडून कडुन १५ दिवसात समस्या सोडविण्यात येतील काय? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com