रमेश बामणकर
अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी:- तालुक्यात दोन दिवसापासून सतत मुसळधार पावसामुळे निमलगुडम परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती व निमलगुडम गावातील अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे. अन्नधान्य पाण्यात वाहून गेले. सतत पाऊस व पुराचे पाणी वाढत होता त्यामुळे गावातील नागरिकाना भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गावानजीक मोठा नाला वाहत असल्याने तुडूंब भरून पुर परिस्थिती निर्माण झाली याची माहिती उप पोलिस ठाणे राजाराम खां च्या पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे यांना कळताच तत्काळ आपले सहयोगी अधिकारी व पोलीस शिपाई यांना घेउन निमलगुडम गाठले व पूरग्रस्ताना बचाव कार्य व मदत कार्य केले. यावेळी पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, उप पोलीस निरीक्षक विजय कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते अनिल पेंदाम, तमुस अध्यक्ष नागेश शिरलावार, पोलिस शिपाई व अन्य युवकांनी मदत केले.