नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
पवनी -तालुक्यातील गांधी विद्यालय वलनी तर्फे आषाढी एकादशीनिमित्त परिसरातील विद्यार्थ्यांना
विद्यालयात येण्याची गोडी निर्माण व्हावी, एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये(मिशन ड्राफ आऊट) या हेतूने पाल्यांना शाळेत पाठविण्याची पालकांची सकारात्मक मानसिकता निर्माण व्हावी म्हणून विद्यालयातून या चिमण्यांनो परत फिरा रे हा नारा देत जनजागृती रँली व शिक्षणाची वारी काढण्यात आली. घराघरात ज्ञानेश्वरीचे पारायण व्हावे, ज्ञानेश्वरीचे महत्त्व कळावे म्हणून पालखीत विठ्ठल-रखुमाई व ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवण्यात आला होता. पालखीचे पूजन मा.ओ.आर.वैद्य सर(मुख्याध्यापक, गांधी वि.वलनी), मा.दिनकरराव सेलोकर, मा.दिपकजी तिघरे( सरपंच, ग्रामपंचायत वलनी),मा. दिपकजी सावरबांधे, मा.रामचंद्रजी भुरे (उपाध्यक्ष, शिक्षकपालक संघ) ,मा. आर.आर.जांभूळकर(जेष्ठ शिक्षक) यांनी पालखीचे विधिवत पूजन करून पालखी उचलून मार्गस्थ केली.पूर्ण वलनी गाव ज्ञानबा-तुकाराम म्हणत पालथा घालून शेवटी शिवनाळा गावातील उभ्या महाराष्ट्राचे दैवत प्रसिद्ध विठ्ठल-रखुमाई मंदिरात जाऊन विद्यार्थी व शिक्षकांनी फुगड्या घालून, टाळमृदंगाच्या गजरात पालकांनी भजने गाऊन वारीची सांगता केली..
विद्यालयातील सर्व कर्मचारीवृंद यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.