दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
एन.जागतिक मानवाधिकार संघटन हे मानवाधिकारांचे सर्व प्रकारचे रक्षण करणारे असून या संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके हे आज महत्त्वपूर्ण अशा दोन पदाधिकाऱ्यांसी गोपनीय चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मध्यमा मनिष सवाई,महाराष्ट्र राज्य संघटक दिलीप तांदळे यांच्या सोबत संयुक्तपणे अनेक विषयांवर आज महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके हे सविस्तर चर्चा करणार आहेत.
संघटनेची बांधणी,संघटने अंतर्गत कार्य,संघटने अंतर्गत उपक्रम,संघटने अंतर्गत कार्यक्रम,संघटने अंतर्गत नागपूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक,आणि नागपूरला होणाऱ्या कार्यक्रमा संबंधाने विचारविनिमय यावर चर्चा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.