सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
सावली येथे विश्वशांती विद्यालयाच्या पटांगनावर सावली तालुका युवक काँग्रेस व सावली शहर युवक काँग्रेस तर्फे नवनियुक्त पदाधिकारी जेष्ठ नागरिक , १०-१२ वितील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शहरातील गणमान्य व्यक्तींचा सत्कार समारंभ पार पडला.
याच दरम्यान सावली येथील स्वच्छतादूत म्हणून परिचित असलेले प्रशांत तावाडे यांचा राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.स्वच्छ भारत अभियान सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. शासनाच्या या उपक्रमात नागरी स्वराज्य संस्था , स्थानिक स्वराज्य संस्था आपआपल्या परीने स्वच्छतेचे काम करीत आहेत पण सावली येथिल प्रशांत तावाडे हे नेहमीच सामाजिक कामात पुढाकार घेत असतात.या स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी होऊन मुख्य रस्ता, चौक नित्य नेमाने स्वच्छ करीत असतो या कामाचे सर्व स्तरावरून प्रशांत तावाडे यांचे कौतुक होत आहे.
अनेक सेवाभावी संस्था त्यांचा सत्कार करीत आहेत,सत्कार समारंभा दरम्यान राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, माजी नगराध्यक्ष गडचिरोली अँड.रामभाऊ मेश्राम,माजी बांधकाम सभापती जि.प.दिनेश पाटील चिटणुरवार, युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती दिवाकर भांडेकर, माजी सभापती प.स.सावली विजय कोरेवार, सावली तालुका काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष नितीनजी गोहणे, तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यलवार, तसेच शहराध्यक्षा सौ.भारती चौधरी, नगर पंचायत सावलीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरषोत्तम चुदरी, उपाध्यक्ष ब्रम्हपुरी विधानसभा युवक काँग्रेस नितीन दुवावार, नवनियुक्त युवक तालुकाध्यक्ष किशोर कारडे व शहराध्यक्ष अमरदीप कोनपत्तीवार, कमलेश गेडाम तसेच कार्यकर्ते व गावाकरी उपस्थित होते.