गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट उडान अंतर्गत “रोजगार मेळाव्याचे” आयोजन…

 

डॉ.जगदिश वेन्नम

     संपादक 

गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल व पार्कसन्स स्किल सेंटर,नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आज “रोजगार मेळावा” पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे पार पडला.

      या रोजगार मेळाव्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील 70 बेरोजगार युवती नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी सहभागी झाले होते.

       यावेळी उपस्थित उमेदवारांमधुन पार्कसन्स स्किल सेंटर,नागपुर यांचे मार्फत 40 नर्सिंग असिस्टंट महिला उमेदवारांची निवड प्रशिक्षणाकरीता करण्यात आली.

        प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या सर्व युवतींना नियुक्तिपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.यावेळी नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या उमेदवारांचे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता यांनी कौतुक केले असून,त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

      यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले की,गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून,नेहमी तुमच्या पाठीशी राहील.

      तसेच सन 2023 या वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे दुर्गम-अतिदुर्गम भागातील युवक-युवतींसाठी १० हजार नवीन रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट आहे. 

       आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून द्यावे व त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कुटूंबियांचे जीवनमान उंचवावे.असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. 

     आतापर्यत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन आतापर्यंत सुरक्षा रक्षक 512, नर्सिंग असिस्टंट 1237, हॉस्पीटॅलिटी 314, ऑटोमोबाईल 276, इलेक्ट्रीशिअन 167, प्लंम्बींग 35, वेल्डींग 38, जनरल डयुटी असिस्टंट 314, फील्ड ऑफीसर 11 व व्हीएलई 52 असे एकुण 2916 युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच ब्युटीपार्लर 174, मत्स्यपालन 87, कुक्कुटपालन 565, बदक पालन 100, शेळीपालन 142, शिवणकला 277, मधुमक्षिका पालन 53, फोटोग्राफी 65, भाजीपाला लागवड 1395, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण 1062, टु व्हिलर दुरुस्ती 134, फास्ट फुड 127, पापड लोणचे 59, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण 592, एमएससीआयटी 231, कराटे प्रशिक्षण 48 व सॉफ्ट टॉईज प्रशिक्षण 35 असे एकुण 5186 युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

       सदर रोजगार मेळावा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता,श्री.हेमंत बन्सोड, मोबलायझेशन अॅन्ड प्लेसमेंट हेड,पार्कसन्स स्किल इन्स्टीट¬ुट, नागपूर,श्री.स्वप्नील उसेंडी मोबलायझेशन गडचिरोली,श्रीमती माधुरी भांडेकर काउंन्स्लर गडचिरोली यांच्या उपस्थितीत पार पडला. 

       सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,पोस्टे,उपपोस्टे व पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.