डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
आलापल्ली:-स्थानिक ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या विविध प्रभागात माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
आलापल्ली ग्रामपंचायत मध्ये समाविष्ठ विविध प्रभागात विकास कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करण्यात आली असून या ठिकाणी विकासात्मक कामे केली जाणार आहे.प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 1 मध्ये समाज मंदिर आणि सी सी रोड, प्रभाग क्रमांक 2 मध्ये सी सी रोड आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये समाज मंदिर बांधकाम केले जाणार आहे.या कामासाठी तब्बल 35 लाखांची निधी उपलब्ध झाली असून भूमीपूजनानंतर विकासात्मक कामांना सुरुवात देखील झाले आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम,उपसरपंच विनोद अक्कनपल्लीवार,ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई अलोने,ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील श्रीरामवार,लक्ष्मण येर्रावार,पराग पांढरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.