अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा नांदगाव खंडेश्वरचे अधिवेशन संपन्न…

युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक

         नुकतेच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ नांदगावचे तालुका अधिवेशन कौटुंबिक वातावरणात पार पडले.

          अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी गजानन चौधरी जिल्हाध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अमरावती हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन किरण पाटील मार्गदर्शक तथा राज्य उपाध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघ यांनी केले.

          या अधिवेशनमधे प्रामुख्याने संजय झंझाड गटविकास अधिकारी, प्रमिलाताई शेंडे, गटशिक्षणाधिकारी, कल्पनाताई वानखडे अधीक्षक, सुभाष सहारे, सरचिटणीस अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ मनोज चौरपगार संचालक, संजय नागे संचालक, संजय साखरे कार्याध्यक्ष, सुनिता पाटील, निळकंठ यावले, पंडितराव देशमुख, विलास राठोड, गौतम गजभिये, बाबाराव गुंड, राजेंद्र पोकळे, शंकरराव बकाले, गजानन खोपे, प्रविण सेंदरे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.

         सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि महापुरुषांचे व दादासाहेब दोंदे यांचे प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

          सूत्रसंचालन उमेश शिंदे यांनी पार पाडले. तर प्रास्ताविक प्रविणजी शेंदरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन खोपे यांनी पार पाडले.

          यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला. त्यामधे प्रामुख्याने अशोक बेरड, अशोक कणसे, गजानन निर्मळ, प्रशांत गुल्हाने, राजेंद्र कैथवास यांचा समावेश होता. त्यानंतर तृप्ती शिंगणवाडे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान संघटनेतर्फे करण्यात आला. या अधिवेशन मधे राजेंद्र काळे, गोपालसिंग चव्हाण, इंदिरा पोटेकर, मंजिरी उमक, आणि मित्रमंडळी यांनी संघटनेमध्ये प्रवेश केला.

          अधिवेशनामधे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा नांदगाव खंडेश्वरच्या नवीन कार्यकारिणी ची घोषणा सुभाष सहारे जिल्हा सरचिटणीस यांनी केली.

           त्यामधे पुढील प्रमाणे पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. उमेश शिंदे अध्यक्ष, प्रशांत भगेवार सरचिटणीस, निखिल सवाई कार्याध्यक्ष, दिनेश धुर्वे कोषाध्यक्ष, भूषण बागडे सहसचिव, गोपाल सिंग चव्हाण प्रसिद्धीप्रमुख, दिनेश मेटकर, राजेश कडू, राजेंद्र काळे, राज आंधळे, राजू कांबळे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

            तर महिला आघाडी नविन कार्यकारिणी मधे सुनिता राऊत अध्यक्ष, संगीता मंडे सरचिटणीस, उज्वला बेहरे कार्याध्यक्ष, सुवर्णा कडू कोषाध्यक्ष, संगीता ठाकरे, मंजिरी उमक सहसचिव, नीलिमा मानकर, माया खानझोडे, इंदिरा पोटेकर, कविता मासोदकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आपल्या उद्घाटनिय भाषणमधे किरणजी पाटील यांनी संघटनेच्या स्थापनेचा इतिहास व नांदगाव शाखेच्या बद्दल माहिती दिली.

           कार्यक्रमास प्रामुख्याने सुभाषजी सहारे,संजयजी झंझाड, प्रमिलाताई शेंडे, निळकंठजी यावले, सुनीताताई पाटील यांनी मार्गदर्शन केले.

            कार्यक्रमाचे अधिवेशनात मान्यवरांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे ध्येय धोरणे, उद्दिष्टे तथा आपली उपलब्धी याबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली. कार्यक्रमस्थळी सुंदररांगोळी व संघटनेचा लोगो काढण्यात आला होता. या कार्यक्रमाकरिता नांदगाव खंडेश्वर आणि जील्यामधून आलेले अनेक शिलेदार उपस्थित होते.

            या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज मंडे, जितेंद्र यावले, गजानन खोपे, प्रवीण शेंदरे, उमेश शिंदे, प्रशांत भगेवार, राज आंधळे, राजू कांबळे, दिनेश धुर्वे, संजय पेटले, राजेंद्र मांगुळकर, निखील सवाई, कमलाकर कदम, सुधाकर सेटे, प्रवीण खरबडे, ओंकार राऊत, गजानन इंगळे, अण्णा कडू, प्रशांत सव्वालाखे, सुनील दुधे, राजेंद्र सावरकर, विजय पवार, सुरेंद्र पतींगे, श्रीकृष्ण दुधे, अरुण चव्हाण, प्रफुल्ल ढोरे, भूषण ठाकूर, चंदू रामटेके, अतुल खारकर, सुनील बागडे, संजय मगर्दे, नितीन कांबळे, संतोष तामसकर, संजय साखरकर, गजानन कोरडे, गजानन नीचत, सुनील बागडे , उज्वल पंचवटे, गजेंद्र खोलापुरे, मनोहर शेळके, शरद वानखेडे, संजय भरणे, शेखर खोलापुरे, पोकळे सर, सातपुते सर, समाधान मोहोड, किशोर खोब्रागडे, विलास गावणेर, रवी मेश्राम, संजय नेवारे, संजय इंगोले, सुनिता राऊत, नीलिमा मानकर, संगीता मंडे, माया खांनझोडे, प्रभा मगर्दे, संगीता देसली, अर्चना इंगळे, ज्योती वैद्य, सीमा सिस्टे, आशा सातपुते, मंगला गुजर, मीनाक्षी भरणे, कविता मासोदकर, अल्का खोपे, सुनंदा इंगोले, मिना विंचूरकर, मेघा ग्रेसपुंजे, ज्योती खाटेकर, प्रांजली अंजिकर, पेटले मॅडम, दर्शना कोडापे, मंजुषा हिरुळकर, जया कुंभलवार, अर्चना मेश्राम आणि बहुसंख्य सदस्य अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, शाखा नांदगाव खंडेश्वर यांनी सहकार्य केले. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली असे प्रसिद्धी प्रमुख सुरज मंडे यांनी कळविले आहे.