रत्नदीप तंतरपाळे
चांदुर बाजार तालुका प्रतिनिधी
11 मे ते 20 मे या दरम्यान पूर्ण प्रकल्पाचे पाणी नदीपात्र सुटणार असून पावसाळ्यापूर्वी पूर्णा प्रकल्पाच्या दरवाजाचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी हे पाणी सोडण्यात येणार आहे.
प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
11 मे ला सकाळी 11 वाजतापासून पाणी सोडणार असून यावेळी पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद 40 घनमीटर राहणार आहे.
पूर्ण प्रकल्पात पावसाळ्यात वाढणारा जलसाठा पाहता धरणाच्या सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून प्रकल्पाच्या दरवाजाची दुरुस्ती होणे क्रम प्राप्त आहे. परंतु सध्या प्रकल्पाच्या दरवाजापर्यंत पाणी साठा असल्यामुळे दरवाजा दुरुस्त करण्याकरिता त्याच्या खालच्या पातळीपर्यंत पाणी सोडणे आवश्यक आहे..
त्याकरिता 11ते 20 मे दरम्यान पाणी सोडणार असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले आहे.
या पाण्यामुळे पूर सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले असून,नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.याचबरोबर नदीपात्रात कोणीही जाऊ नये असे प्रशासनां मार्फत सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी सजग राहावे
तालुक्यातील पूर्वीच्या काठावरील गावांना याबाबतची सूचना तलाठी व ग्रामपंचायत द्वारे देण्यात आली आहे.नदी काठावरील गावांनी सजग राहून दिलेल्या सूचनांचे पालन कराणे आवश्यक आहे त्यामुळे जीवित व वित्तहानी टाळाता येईल.
प्रथमेश मोहोड
प्रभावी तहसीलदार,चांदूरबाजार