चिमूर  तालुकातंर्गत मौजा पळसगांव (पी.) येथील सरपंच सरीता गुरूनूले यांच्या वर अपात्र होण्याची टांगती तलवार… 

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

   पळसगांव (पी.) येथील वीद्यमान सरपंच सरीता विकास गुरूनुले यांनी आठवडी बाजारच्या सरकारी जागेवर अतीक्रमण करून राहत असल्याची तक्रार संजय सोनेकर ग्राम.पंचायत सदस्य यांनी २० फेब्रुवारी २०२५ ला अप्पर जिल्हाधिकारी चिमूर व तहसीलदार चिमूर यांच्या तक्रार केली आहे.

        या तक्रारीच्या अनुषंगाने १७ फेब्रुवारीला पळसगांव येथील स.न.४२८ मध्ये नीवडणुक अधीकारी तथा तहसीलदार चिमूर यांचे पञ क्रमांक कावि १ मी.सहा/नीवड १२०२५ दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ अन्वये तलाठी शुभम बतकी तसेच गावातील पंचासमक्ष मौका पाहणी केली. 

         मौजा पळसगांव येथील ४२८ आराजी १.२१ हे आर भोगवटादार सरकारी कुरण या शासकीय जागेवर अतिक्रमण असुन अर्जदार श्री.संजय सोनेकर ग्रा.प.सदस्य यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी केली असता सरीता गुरूनुले सरपंच यांचे सासरे तुकाराम गुरूनुले यांनी ४२८ पैकी अंदाजे २५×२५=६२५ चौ.फुट सरकारी जागेत अतिक्रमण करून राहत असल्याचे दिसुन आले.

          सरपंच यांना स्वमालकीचे कोणतेही घर नाही. निवडणुक विभागाला घर असल्याचे खोटे शपथपत्र दीले होते. त्यामुळे सरपंच सरीता गुरूनुले यांचे ग्राम पंचायत सदस्य पद जाण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे त्यांच्यावर सरपंच पद जाणार असल्याची टांगती तलवार आहे.