प्रेरणा मैत्री ग्रुप च्या वतीने महिला महोत्सव कार्यक्रम संपन्न… — चिमूर ची दिशा बनकर शासकीय सेवेत रुजू झाल्याबद्दल केला सत्कार… — महिलांचा उत्स्फूत प्रतिसाद…

रामदास ठुसे नागपूर

   विभागीय प्रतिनिधी

   शुभम गजभिये

     विशेष प्रतिनिधी            

               जागतिक महिला दिन निमित्त प्रेरणा मैत्री ग्रुपच्या वतीने दिनांक ८ मार्च ला महिला महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन संध्या चंदनखेडे शिक्षिका यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून केले.

   

           शेतकरी भवन येथे पार पडलेल्या महिला महोत्सवच्या अध्यक्ष स्थानी भावना भोपे तर प्रमुख अतिथी बागला कॉन्व्हेंटच्या प्राचार्य मीरा पेंडके होत्या. 

        चिमूर येथील दिशा बनकर कॅनल इन्स्पेक्टर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  

                  एक दिवसीय महिला महोत्सव प्रसंगी कॅट वॉक स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक भावना पाहुणे, द्वितीय क्रमांक निकिता निवटे यांना मिळाला. समूह नृत्य मध्ये प्रथम क्रमांक साऊथ ग्रुप, द्वितीय क्रमांक आदिशक्ती ग्रुप तर तिसरा क्रमांक न्यू प्रगती कॉलनी ग्रुप व प्रोत्साहन स्त्री शक्ती ग्रुपला मिळाला.

            एकल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक भाग्यश्री डुंबरे, द्वितीय क्रमांक श्रद्धा करीये तर तृतीय क्रमांक श्यामली बेजलवार व प्रोत्साहन प्रतिभा बोकडे यांना मिळाला.युगल नृत्य मध्ये प्रथम क्रमांक स्मार्ट लेडीज ग्रुप पटकावला तर प्रोत्साहन बक्षीस द क्वीन ग्रुपला देण्यात आला. खेळामध्ये प्रथम क्रमांक एकता शिरभैय्ये तर द्वितीय क्रमांक सुधा हेडाऊनी मिळविला. 

                विजेत्या स्पर्धक ग्रुपला मान्यवरांचेच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. प्रास्ताविक गायत्री झुरमुरे यांनी केले. स्वागत गीत अर्चना भोपे यांनी केले.संचालन अर्चना लोथे व धनश्री बिरजे तर आभार वैशाली लखमापुरे यांनी व्यक्त केले.

          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संध्या चलपे, शिल्पा अढाल, नम्रता राचलवार, जयश्री दानव, कविता वरघणे, नितु पोहनकर,राधा पुराणिक, उमा जाधव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास महिलांची उपस्थिती होती.