
शार्दुल पचारे
शहर प्रतिनिधी चिमूर
दखल न्यूज भारत
चिमूर :- मूकबधिर विद्यालय चिमूर येथे आईच्या वर्ष श्राद्धाचे औचित्य साधून चिमूर येथील मूकबधिर विद्यालय येथे कार्यक्रम केला संपन्न.
अनेक जण आपापल्या वाढदिवस अथवा कोणत्याही कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करत असतो मात्र हा कार्यक्रम करतांना खर्च खूप करतो. याचाच विचार करून किरण मोहिनकर या महिलेने मूकबधिर विद्यार्थ्यांना मदत सुद्धा होईल आणि आपण केलेल्या कार्याचे फलीत झाल्याचे आनंद मिळेल या उद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मूकबधिर विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी नोटबुक, पेन व फळफ्रुट बिस्कीट वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रामदास कामठी, पटवारी कोहपरे, ताराचंद बोरकुटे,राजु बन्सोड, अशोक विभुते,किरण मोहिनकर,क्रिश सहारे, ज्योतीताई मिसार यावेळी उपस्थित होते.