
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
मुल :- महाराष्ट्र पोलीस सेवा अधिकारी म्हणून प्रमाेद चौगुले यांनी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून मूल पाेलिस ठाण्याचे प्रशासन हातात घेऊन पंधरवाडा लाेटला.
सदर १५ दिवसात अवैध व बेकायदेशीर धंद्याविराेधी अभियान सुरू करून मूल तालुक्यातील जनतेला शांतता व सुव्यवस्था संबधाने शाश्वत केल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य पञकार संघ मुंबई तालुका शाखा मूल तर्फे मपाेसे अधिकारी प्रमाेद चौगुले यांची भेट घेऊन अभिनंदन करण्यात आले व तालुक्यातील सुव्यवस्था संबधाने संवाद साधण्यात आले.
आपण जाेपावेताे इथे परिविक्षाधीन अधिकारी म्हणून काम करणार आहाेत जाेपावेताे अवैध व बेकायदेशीर धंद्याविराेधी अभियान सुरू ठेवून मूल तालुक्यातील जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही मपाेसे अधिकारी प्रमाेद चौगुले यांनी दिली.
यावेळी राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा.महेश पानसे, मूल तालुका अध्यक्ष सतिश राजूरकर, सचिव राजेंद्र वाढई, पदाधिकारी धमाल सुत्रपवार आदी उपस्थित होते.