
ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : तालुक्यातील ग्राम उकारा येथे भारतीय किसान संघाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी भारतीय किसान संघाचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र पांडे, जिल्हा मंत्री दिनेश कापगते ,जिल्हा कोषाध्यक्ष मधुकर कापगते , जिल्हा सहमंत्री ऋग्वेद येवले,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंताजी लांजेवार, उकाराच्या सरपंचा सौ. शालुताई इलपाते, कृषी सहायक दुर्गाप्रसाद भोंडे , पूनाराम कठाने , दिनेश तावडे, निळकंठ कठाने, लक्षमन कठाने , उदाराम वघारे, हंसराज कोरे, सुमेध इलमकर, सुमित इलमकर, देवेंद्र मोटघरे, यशवंत मोटघरे, पंढरी मोटघरे , तुलाराम तरोने, मनूदेव वघारे, काशिनाथ भेंडारकर आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्ते दिनेश कापगते यांनी भारतीय किसान संघ ची स्थापना व कार्यपद्धती, आगामी लक्ष या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
किसान संघाचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र पांडे यांनी, किसान संघ ची कार्यपद्धती समोर ठेवली, संचालन दिनेश तावडे यांनी तर आभार पूनारम कठाने यांनी केले.