धानोरा /भाविक करमनकर
स्थानिक धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंकज चव्हाण सर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. किरमीरे सर डॉ. चुधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंकज चव्हाण सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉ किरमिरे सर यांनी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याचा उलगडा करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉ चुधरी सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास यावर विस्तृत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन रा से यो कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश बनसोड यांनी केले. तर आभार डॉ प्रियंका पठाडे यांनी मानली यावेळी महाविद्यालयाचे प्रा डॉ जमब्बेवार मॅडम प्रा डॉ लांजेवार प्रा डॉ. डी बी झाडे प्रा डॉ धवणकर सर प्रा डॉ मुरकुटे प्रा डॉ गोहने सर प्रा पुण्यप्रेड्डीवार प्रा भैसारे प्रा तोंडरे प्रा वटक प्रा धाकडे प्रा खोब्रागडे प्रा करमनकर व प्रशासकीय कर्मचारी व महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.