कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:-उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पारशीवणी अंतर्गत आज दि. 09/03/2023 ते 11/03/2023 या कालावधीत तिन दिवसिय ग्रामसंघाचे लिपिका करिता VBKM1 उजळणी प्रशिक्षनाचे तीन दिवसीय प्रशिक्षण पंचायत समिती कार्यालयच्या सभागृहात आयोजित करण्यात आले.सदर प्रशिक्षण अनिवासी स्वरूपात देण्यात येत असून सदर प्रशिक्षणामधील आजचा पहिला दिवस यामध्ये एकुण 23 ग्रामसंघातील लिपिका उपस्थित होत्या
आजच्या प्रशिक्षणाच्या सत्रात मान.श्री.सुभाष जाधव गट विकास अधिकारी पंचायत समिती पारशीवणी यांनी लिपिकाना बचत आणि बचतीतून पैशाची वाढ आणि लेखे अध्यावत चे महत्व विशद केले.तालुक्याच्या वेग वेगळ्या ग्राम पंचायत मधील ग्रामसंघाच्या लिपिका यांना यावेळी पंचायत समिती चे राजू बोरकर तालुका व्यवस्थापक यांनी आणि प्रभाग समन्वयक अंकुश शुक्ला आणि धमेंद्र दुपारे, जयशिला लांजेवार ललिता घोडमारे यांनी प्रशिक्षण दिले. CRP, bank सखी,पशू सखी उपस्थित होते.