नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -श्री संत तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळ परसोडी येथे पुण्यतिथी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल किरणापुरे पंचायत समिती सदस्य ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयश्रीताई पर्वते सरपंच, अशोक कापगते माजी जि.प.सदस्य, प्रशांत जी कापगते उपसरपंच, नंदू भाऊ कावळे, मोरेश्वरजी चुटे, संदीप भांडारकर, रामकृष्णजी पातोडे,दिलीप पर्वते, दुर्गा उके,वंदना कांबळे,पुनम सांदेकर, अविनाश बनकर,ग्यानीराम पातोडे,व समस्त कुणबी बांधव गावकरी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात अनिल किरणापुरे म्हणाले की,भारतात अनेक संत होऊन गेलेत. शरीर रुपाने जरी ते नसले तरी त्यांच्या अमुल्य अशा विचारांच्या रुपाने ते आजही समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे. आपले जीवन योग्य मार्गावर चालवण्यासाठी संतांचे विचार खूप उपयुक्त ठरतात संत तुकारामांनी आपल्या अभंगात सांगितले की “जे का रंजले गांजले,त्याची म्हणे जो आपुले,तोची साधु ओळखावा, देव ते थीची जाणावा.” या अभंगातून संत तुकारामांनी आपले अतिशय सुंदर मार्मिक संदेश दिला आहे या ओळीत असा विचार मांडला की जे लोक त्रासलेले आहेत अशा लोकांना जो आपले मानतो असाच व्यक्तींमध्ये देव असतो.तसेच सज्जन माणसाचे हृदय हे आतून बाहेरून लोण्यासारखे मऊ असते जो निराधार व्यक्तींना आधार देतो असाच व्यक्ती देवाचे रूप असतात. आपण सर्व शेतकरी सर्वसामान्यत वावरत जरी असलो तरी शेती करताना सामूहिक शेती करून आपला व आपल्या परिवाराचा भवितव्य उज्वल करण्याची संधी आपल्या जवळ आली असून आपण आधुनिक तेची जोड देऊन शेती केली पाहिजे , पंचायत समिती स्तरावर कृषीच्या सामूहिक ,वैयक्तिक लाभाच्या योजनाही त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या आपल्या समाजात कृषी उद्योजक तयार होणे काळाची गरज आहे.असे ते बोलत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीचंद भाजीपाले, प्रास्ताविक देवाजी पातोडे, आभार देवानंद कावळे, यांनी केले.