सामाजिक अंकेक्षण ग्राम साधन जिल्हा अध्यक्षपदी अविनाश धोडरे तर जिल्हा सचिव पदावर जयंत रामटेके यांची निवड… 

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

      महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई -३२ यांच्या अंतर्गत जिल्हाअधिकारी रोहयो यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील १०० व्यक्तींची सामाजिक अंकेक्षण करीता ग्राम साधन व्यक्ती म्हणून निवड केली. या निवड झालेल्या ग्राम साधन व्यक्तींना रोहयो मधील झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण करायचे आहे. 

      मात्र निवड होवून आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र या एका वर्षात ग्राम साधन व्यक्ती म्हणून निवड झालेल्या युवकांना फक्त एकच महिना काम मिळाले मात्र बाकी अकरा महिने खाली राहावे लागत आहे. बेरोजगार युवकांच्या सामाजिक अंकेक्षण करणाऱ्या ग्राम साधन व्यक्तींना वर्षातील पुर्ण दिवस हाताला काम मिळावे यासाठी आता लढा उभारला आहे. 

       जिल्ह्यांतील सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया करणाऱ्या ग्राम साधन व्यक्तींची नुकतीच मुल तालुक्यांतील इको पार्क येथे सामूहिक बैठक पार पडली या बैठकीत शेकडो ग्राम साधन व्यक्तीनी उपस्थिती लावली.

        सामाजिक अंकेक्षण ग्राम साधन व्यक्ती संघटना म्हणून जिल्हा स्तरीय व प्रत्येक तालुका स्तरीय समिती गठीत केली. सदर समितीमध्ये महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई -३२ ग्राम साधन व्यक्ती महाराष्ट्र राज्य जिल्हा चंद्रपूर च्या जिल्हा अध्यक्ष पदावर अविनाश धोडरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर जिल्हा सचिव पदावर जयंत रामटेके यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

           रेखा सहारे, सहसचिव विनल बंडेवार, कोषाध्यक्ष स्वप्नील मजगवळे, तर जिल्हा सदस्य म्हणून प्रमोद राऊत, सोनल मून, यशवंत ढोंगे, अजित कोडापे, अनिल महाडोरे, सुभाष उईके, सुभाष कुंभरे, प्रदीप उरकुडे, योगिता देवगिरकर, स्वप्निल चुदरी, धीरज पाल, शशिकांत सहारे, रुपेश सोयाम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

       यांचे जिल्ह्यांतील सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया करणाऱ्या सर्व ग्राम साधन व्यक्तींनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.