
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
लोकशाहीत बदलत्या मतदार व्यवहाराचे विविध पैलू स्पष्ट करून लोकशाहीच्या रक्षणासाठी बुद्धिवादी वर्गाने स्पष्टपणे आपले मत प्रगट करण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ.भारत राठोड, शिवप्रसाद जयस्वाल महाविद्यालय, अर्जुनी (मोरगांव), यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेच्या प्रसंगी व्यक्त केले.
तांत्रिक सत्रात प्रा.डॉ. संदीप तुंडूरवार यांनी सद्यकालीन परिस्थितीत राजकीय मूल्यांमधे होत असलेल्या परिवर्तनावर प्रकाश टाकून हाय प्रोफाईल राजकीय राजकीय जीवनावर भाष्य केले. डॉ.अनुप सिंह यांनी एक देश एक निवडणूक आणि त्याचे परिणाम या विषयावर भाष्य करताना सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्ष आपली भूमिका जनतेपर्यंत योग्य प्रकारे पोहोचविण्यात अपयशी ठरत आहेत असे मत नोंदवले.
राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.रवी धारपवार यांनी सद्यकालीन निवडणुकीत प्रसार माध्यमांच्या बदललेल्या भूमिकेवर भाष्य केले. तांत्रिक सत्राचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे यांनी अध्यक्षीय भाषणातून लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदारांनी निर्भिड आणि निष्पक्षपातीपणे मतदान केले पाहिजे असे मत व्यक्त केले. या राष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंधाच्या अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी सेवा शिक्षण समिती, चिमूर संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक येवले हे होते, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव विनायक कापसे संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.भोयर, प्रा.डॉ.संतोष बनसोड, अमरावती, प्रा.डॉ.नारायण कांबळे हे होते. तर राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटक गोंडवाना विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा.श्याम खंदारे यांच्या हस्ते संपन्न झाले. तर विचारपीठावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल इतर मान्यवर उपस्थित होते.
या एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पितांबर पिसे यांनी केले.
या परिषदेसाठी देशभरातून अनेक प्रतिनिधी सहभागी झाले होते. ही परिषद यशस्वी करण्याकरिता इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. राजुरवाडे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. कत्रोजवार यांनी परिश्रम घेतले.