
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील नेरी येथील अतिक्रमण हटविल्याने कही खुशी कही गम अशी अवस्था निर्माण झाली आहे.
ज्यांचे दुकाने हटविण्यात आले त्यांचे व्यवसाय बंद पडले त्यांना अनेक समस्यांना सहन करावे लागत आहे. मात्र त्या पिएचसी चौकातील जागेचे लेवलींग करणे सुरू आहे विस्थापितांना रिकामी जागा मिळुन आणि त्यांचे व्यवसाय पूर्ववत सुरू होऊन गुजरान सुरू होईल याकडे ग्रामपंचायत पदाधिकारी प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
अतिक्रमण हटविले पण ज्यांचे जगणे कठीण झाले त्यांच्या आस्थेपणासाठी ग्रामपंचायत कार्यरत आहे.
अतिक्रमण करताना नियमाचे भान ठेवले पाहिजे माहिती नसेल तर विचारपूस चौकशी केली पाहिजे व सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण केले गेले पाहिजे कायद्याची प्रक्रिया करून घेऊन निर्णय घेतले जावे.
या भागातील लोकांना केवळ आश्वासने देऊन होणार नाही तर लोकहितकारी योजना आखाव्या लागतील परंतु विकासाच्या घोषणा होतात व योजना येत नाही आणि आल्यावर त्यांच्या अंमलबजावणीकडे कानाडोळा केला जातो ज्यांचे निवासस्थान दुकाने अतिक्रमणाच्या नावाखाली हटविण्यात आले त्यांचे जीवन जगण्याचे मूलभूत अधिकाराचे हनन केले जाऊ नये.
लोकशाही धोक्यात घेऊ नये व संविधानिक मार्गानेच निर्णय अंमलबजावणी केली जावी अशी रास्ता अपेक्षा जानकर वर्तुळात व्यक्त होत आहे.