
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चुकीला माफी नाही हे वास्तव पुढे ठेवून आरोपी,अभिनेता श्री.राहुल सोलापूरकर उर्फ पुणेकर याचावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान केल्याबद्दल महाराष्ट्रातील प्रत्येक पोलिस ठाण्यात FIR दाखल करावे असे आवाहन संविधान अभ्यासक विनोदकुमार खोब्रागडे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.
आंदोलन करुन,मोर्चा,काढून,निषेध करुन,निवेदन देऊन काही उपयोग नाही.यामुळे महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यात ३६ FIR दाखल करावे,मग पहा, कुणाचीही हिम्मत होणार नाही महापुरुषांच्या बदल अपमान करण्याची,असे सुचक विधान विनोद खोब्रागडे यांचे आहे.
महापुरुषांचा अपमान जाणिवपूर्वक करणाऱ्यांची भुमिका काही समाजद्वेषी करीत आहेत,त्यांना कायदेशीर दृष्ट्या वेळीच आवरले पाहिजे असेही विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे विद्यार्थी,भारतीय संविधानाचे अभ्यासक वरोरा,चंद्रपूर यांचे रोखठोक मत आहे..
******
रेल्वे ठेकेदार..
आज,दिनांक १०/०२/२०२५ रोजी रेल्वेच्या ठेकेदार आरोपी श्री.सिद्धार्थ गुप्ता,जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी सी,सहाय्यक जिल्हाधिकारी वरोरा श्री.जेनित चंद्रा,पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यासह ११ आरोपी विरुद्ध फौजदारी खटल्यात वरोरा न्यायालयातुन फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याची चिन्हे आहेत.
तिसऱ्या रेल्वेच्या लाईन साठी मोठ्या प्रमाणात मुरुमचे अवैध उत्खनन रेल्वेचे ठेकेदार श्री.सिद्धार्थ गुप्ता यांनी केले असतानाही महसूल अधिकारी थातुरमातुर चौकशी करून दंड करुन आरोपीवर चोरीचा गुन्हा (FIR) दाखल न करता मागील अनेक महिन्यांपासून प्रकरण चालवत होते व आजही प्रकरण चालवत आहेत.
अखेर विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी फौजदारी खटला वरोरा न्यायालयात महसूल अधिकारी व पोलिस अधिकारी आणि रेल्वेच्या ठेकेदारवर खटला दाखल केला आणि आज दिनांक १०/०२/२०२५ रोजी फैसला होणार आहे.
ज्याअर्थी एक पटवारी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांनी अनेक वाळु् माफीया,अनेक मुरूम माफिया यांचे अवैध उत्खनन केलेले अनेक ट्रक पकडुन करोडो रुपयांचा दंड करुन वरोरा पोलिस ठाण्यात दिनांक १९/११/२०२१ रोजी FIR दाखल करुन दाखविले आहे.
त्याअर्थी महसूल अधिकारी व पोलिस अधिकारी यांनी रेल्वेचे ठेकेदार श्री.सिद्धार्थ गुप्ता यांनी सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम उत्खनन केले असतानाही,पंचनामा केला असतानाही,तिन महिन्या पासून FIR दाखल का केले नाही?असा प्रश्न जनसामान्या नागरिकात उपस्थित होत आहे.
अखेर विनोदकुमार खोब्रागडे पटवारी यांनी फौजदारी खटला,कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांचा,न्यायालयात आरोपी रेल्वेचे ठेकेदार श्री.सिध्दार्थ गुप्ता सह दोन IAS अधिकारी,दोन IPS अधिकारी सह ११ आरोपी विरुद्ध फौजदारी पीटिशन दाखल केली,त्यामध्ये सुनावणी पुर्ण झाली असुन प्रकरण आज दिनांक १०/०२/२०२५ ला आदेशा करीता लागले आहे.
फिर्यादी -संघर्षी आयु. विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे विद्यार्थी,संविधानाचे अभ्यासक यांनीच फौजदारी खटला दाखल केला असून जबरदस्त आर्गुमेंन्ट केले व वस्तुस्थिती समजावून सांगितले आहे.पहिल्याच आर्गुमेंन्ट मध्ये प्रकरण आदेशाकरीता लागले आहे.
सविस्तर असे की कोर्ट विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी वरोरा यांच्या न्यायालयात रेल्वेचा ठेकेदार आरोपी सिद्धार्थ गुप्ता,जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी सी,IAS अधिकारी,सहाय्यक जिल्हाधिकारी श्री.जेनित चंद्रा वरोरा IAS अधिकारी,मुमक्का सुदर्शन पोलिस अधीक्षक चंद्रपूर, IPS अधिकारी,नयोमी दशरथ साठम साहाय्यक पोलीस अधीक्षक वरोरा IPS अधिकारीसह १२ आरोपी विरुद्ध फौजदारी खटला मध्ये सुनावणी झाली आहे.
वरिष्ठ महसूल अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आले आहे.
मा.सुप्रीम न्यायालयाचे पाच न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश व इतर मध्ये,क्रिमीनल रिठ पीटीशन ६८/२००८ मध्ये महत्त्व पुर्ण निर्देश पोलिस प्रशासन यांना दिले होते,त्यांचे पोलिस प्रशासन यांनी जानीवपुर्वक उल्लंघन केले आहे,म्हणून त्यांना सुद्धा आरोपी केले आहे.
खनिज सवलत अधिनियम १९६० कलम २१(६) नुसार अवैध उत्खनन करने हा दखलपात्र गुन्हा आहे,शासनाचे परिपत्रक सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांना आहेत.तरीही त्यांनी रेल्वेच्या ठेकेदार वर FIR रजीष्टर केले नाही,ही शोकांतिका आहे.
आपल्या देशात कायद्याचे अर्थात भारतीय संविधानाचे राज्य आहे मनमानीचे नाही,कायद्यापुढे सर्व समान आहेत,भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ पहावे….
राष्ट्रीय संपत्तीची शेकडो करोडो रुपयांची खुलेआम लुटमार होत असताना महसूल अधिकारी व पोलिस अधिकारी यांनी बघायची भुमिका घेतली होती,व आपल्या कर्तव्यात कसूर केले आहे,म्हणून त्यांनाही आरोपी केले आहे.
अखेर,अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात,आरोपी वरोरा रेल्वेचे सहाय्यक अभियंता सिद्धार्थ गुप्ता,श्री.विनय गौडा जी सी जिल्हाधिकारी चंद्रपूर,श्री.जेनित चंद्रा सहाय्यक जिल्हाधिकारी वरोरा,श्री.योगेश कौटकर तहसीलदार वरोरा, श्री.उल्हास लोखंडे नायब तहसीलदार वरोरा,श्री.मधुकर काळे नायब तहसीलदार वरोरा,श्री.रंनजीत बरानपुरे मंडळ अधिकारी व तलाठी कवडु आत्राम व आखाडे लिपीक व ठाणेदार तांबळे वरोरा,उपविभागीय पोलिस अधिकारी साठम मॅडम वरोरा,पोलिस अधीक्षक चंद्रपूर सुदर्शन यांचावर फौजदारी कारवाई साठी वरोरा न्यायालयात फौजदारी पीटिशन दाखल केली होती.
दिनांक १०/०२/२०२५ ला आदेशाकरीता प्रकरण आहे…
आरोपी श्री.सिद्धार्थ गुप्ता यांनी मौजा डहाडा रिठा येथील सरकारी स.नंबर २४ क्षेत्र ४.२७ मधुन अवैध मुरुम उत्खनन करून मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीची लुटमार करीत असतांनाही,त्यांच्या गाड्या जप्त करुनही,महसूल अधिकारी यांनी,व पोलिस प्रशासन यांनी आजपर्यंत FIR दाखल का केले नाही?
दंडाची रक्कम सुद्धा एक करोड एक्कावन लाख रुपये आजपर्यंत वसुल केले नाही व आरोपी श्री.सिद्धार्थ गुप्ता यांच्या कडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार अप्रत्यक्ष करुन बचाव करण्याचा प्रर्यत्न केला आहे व आपल्या कर्तव्यात कसूर केले आहे.
शेवटी विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक यांनी वरोरा पोलिस ठाण्यात गंभीर रिपोर्ट दिली त्यांनी सुद्धा कारवाई केली नाही.अखेर वरोरा न्यायालयात फौजदारी पीटिशन दाखल केली.
राष्ट्रीय संपत्तीची लुटमार होत असेल तर ते वाचविणे भारतीय संविधानातील अनुच्छेद ५१ क.क.नुसार १ ते ११ चे पालन करणे प्रत्येक नागरिक यांचे कर्तव्य आहे.
(राज्य नियमावली,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अधिनियम २०२३ कलम ३० पहा.)
*****
अन्याया विरुद्ध आवाज उठविला पाहिजे….
— लोक बोलत नाही म्हणून त्यांचावर अत्याचार होतात असे सुप्रीम न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणतात म्हणून बोला,लिहा….
****
संघर्षी आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे विद्यार्थी,संविधानाचे अभ्यासक,सामाजिक कार्यकर्ते,लोकसेवक,प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा,जिल्हा चंद्रपूर…
— ९८५०३८२४२६…
— ८३२९४२३२६१…