संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
छात्ररजनी कार्यक्रम अंतर्गत सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा चे बक्षिस वितरण.
जि.प.वरिष्ट प्राथमिक शाळा लवारी येथे बक्षीस वितरण समारंभ या कार्यक्रमाचे बक्षीस वितरक अनिल किरणापुरे पं.स.सदस्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष निलिमा सोनवणे शाळा व्यवस्थापन स.उपाध्यक्ष, भोजराज निखारे ग्रा.प.सदस्य,नाजूक वाघाडे, प्रदीप टेंभुर्ण, ज्ञानेश्वरी नगरीकर, करिष्मा लांजेवार,प्रभा निखारे अंगणवाडी सेविका,एच.एम.वाघाये मुख्याध्यापक,के.डी.अतकरी,के.आर.राऊत,एम.आर.डोगंवार,पी.बी.मरस्कोल्हे, रुपाली कटनंकर स्वयंसेवीका व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना अनिल किरणापुरे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आधुनिकतेची काल धरावी व एकाग्रतेने आपल्याला दिलेला अभ्यासक्रम पाठ करून आपल्या मधल्या गुण कौशल्याचा विकास करावा, तसेच परंपरागत मैदानी खेळ खेळून आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपावे बक्षीस रुपी पेन, कंपास ,नोटबुक ,पेन्सिल स्केल, जरी असली तरी ते तुमच्यासाठी बक्षीस म्हणून महत्त्वाचे आहेत शालेय स्तरावर विविध स्पर्धेत भाग घेऊन आपले व आपल्या आई वडिलांचे नाव उंच करावे असे ते बोलत होते.
सूत्रसंचालन एम.एम.मेश्राम, आभार एस. एम कोचे,यांनी केले.