![](https://www.dakhalnewsbharat.com/wp-content/uploads/2023/11/photo_2023-11-16_09-08-22.jpg)
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, ग्रंथालय विभाग विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या शासनाचा प्रकल्प महाविद्यालयात राबविण्यात येत आहे.
या निमित्ताने विद्यार्थ्यांना पुस्तकांची व ग्रंथाची ओळख व्हावी हा उद्देश समोर ठेवून महाविद्यालयात ग्रंथालय स्वच्छता अभियान, वाचन अभिवृद्धी, पुस्तक परिक्षण, व व्याख्यान NEP २०२० चे आयोजन करण्यात येणार आहे.
महाविद्यालयात वाचन संकल्प हा कार्यक्रम दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी पर्यत सुरु राहील या कार्यक्रमा निमित प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांनी विद्यार्थ्याची वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल व वाचनामुळे विद्यार्थ्यात आत्मविश्वास व सामाजिक कौश्यल विकसित होईल असे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.
उपप्राचार्य डॉ.प्रफुल्ल बन्सोड, मराठी विभाग प्रमुख डॉ.कार्तिक पाटील,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.हरेश गजभिये, डॉ.रहांगडाले, डॉ.कामडी, प्रा.रुपाली बरडे,प्रा. शितल वानखेडे, प्रा.वर्षा सोनटक्के हे उपस्थित होते.
ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.शैलेश भोयर रासेयो कार्यक्रम अधिकारी,प्रा.डॉ.प्रफुल राजुरवाडे,प्रा.डॉ.नितिन कत्रोजवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.