चिमूर येथे सहजयोग भजन भक्ती संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

          सहजयोग ध्यान साधना केंद्र चिमुरच्या वतीने दि १२ जानेवारी २०२५ रोज रविवारला सकाळी ११ वाजता शेतकरी भवन मेन रोड हजारे पेट्रोल पंप समोर चिमुर जिल्हा चंद तालुका स्तरीय सहज प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून सहज भजन भक्ती संगीताचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.

     या कार्यक्रमाचे गायक म्हणून डॉ. संदीपजी दलाल अमरावती व मिलिंदजी दलाल पुणे यांचा संपूर्ण संच राहणार आहे.

            तरी या कार्यक्रमाकरीता प्रत्येक सहज योगी बंधू आणि भगिनींनी श्री. माताजींना नवीन वर्षाची भेट म्हणून नवीन पाच साधक घेऊन यावे आणि सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रवीण साटोने तालुका समीती समन्वयक चिमुर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.