पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :-अतिदुर्गम, आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याची सर्वात जुनी नगर परिषद असलेल्या देसाईगंज शहरात वास्तव्यास असलेल्या नागरीकांना मागील अनेक वर्षांपासून आश्वासनांच्या खैरातीत पिसल्या जात आहे.
शहरातील नझुल व गावठाण क्षेत्राचे भूमापन करण्यासाठी नगर परिषदेने देय रक्कम अदा करूनही अद्याप रहिवाशांना आखीव पत्रिका देण्यात न आल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पाहु जाता येत्या २३ जानेवारी पर्यंत आखीव पत्रिका देण्यात यावी अन्यथा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा अल्टिमेटम देसाईगंज शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष पिंकु बावणे यांनी भुमिअभिलेख अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला असल्याने संबंधित विभागात चांगलीच खळबळ माजली आहे.
दिलेल्या निवेदनात बावणे यांनी नमुद केले आहे की, देसाईगंज शहराच्या गावठाण क्षेत्रातील रहिवाशांना अद्यापही आखीव पत्रिका देण्यात न आल्याने शासकीय स्तरावरुन देण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल आवास योजना तसेच शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
शहरातील नझुल व गावठाण क्षेत्राचे भूमापन करण्यासाठी देसाईगंज नगर परिषद यांनी भुमिअभिलेख कार्यालय देसाईगंज यांना आवश्यक प्रमाणात रक्कम अदा केलेली आहे. असे असताना भुमिअभिलेख कार्यालयाने देसाईगंज नगर भूमापनाचे काम पुर्ण करून सिमा निश्चित करून नगर परिषदेला आखीव पत्रिका उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र असे न करण्यात आल्याने शहरातील अनेक गोरगरीबांना झोपडीवजा तंबुत राहावे लागत आहे. ही अतिशय गंभीर बाब असुन शासन निर्णयाला हरताळ फासण्यासारखे आहे.
केन्द्र व राज्य शासनाने गोरगरीब नागरिकांसाठी पक्के मकान उपलब्ध व्हावे करीता विविध योजना जाहीर केल्या आहेत. मात्र प्रशासनाच्या भोंगळ व मनमानी कारभारामुळे गोरगरीब नागरिकांवर उघड्यावर संसार थाटावे लागत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता येत्या नागरीकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी
२३ जानेवारीच्या आत आखिव पत्रिका उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा विरोधात भुमिअभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे. पी.लोंढे यांना देखील देण्यात आले असुन यावेळी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नरेंद्र गजपुरे, सेवादल अध्यक्ष भिमराव नगराळे, युवक काँग्रेस जिल्हा प्रवक्ता पंकज चहांदे, महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष आरती लहरी, युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष विजय पिल्लेवान, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष कैलास वानखेडे, राजू राऊत, महिला काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रजनी आत्राम, महिला ओबीसी सेल तालुकाध्यक्ष यामिनी कोसरे, सागर बन्सोड, दुधराम हर्षे, विमल मेश्राम, नरेश लिंगायत, ओमकार कामठे, विशाल मेंढे, भाग्यवान शिवूरकर, सोनी कोहचाळे, वनिता सिडाम, रंजना बागडे, कुंदा लिंगायत, बबिता शंभरकर,सिंधु खोब्रागडे, शारदा सिडाम, इंदू खोब्रागडे, कांताबाई शेन्डे,आशा सोंडवले, सुमंत माटे, रंजना शिवूरकर, सुमित्रा सिडाम आदी पदाधिकारी उपस्थित होते.