सावली ( सुधाकर दुधे )
सावली तालुक्यातील उपरी येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली तालुका शाखा उपरीच्या वतीने आदिवासी बांधवांतर्फे जोमाने नाचत गाजत गावात रॅली काढण्यात आली त्यानंतर झेंडा प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक उपरी ग्रामपंचायतचे सरपंच कुमुदताई सातपुते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच आशिष मनबतुलवार. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन गणपतजी कोठारे. मुख्य मार्गदर्शक मुकुंदाजी मेश्राम सर, विशेष मार्गदर्शक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद सावली तालुका अध्यक्ष प्रवीण गेडाम तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी वाकुडकर. ज्ञानेश्वर शिडाम, नागोराव कोठारे, आत्माराम भूरसे, भाऊजी मोहुरले, डॉक्टर शेडमाके, सुमित्रा भोयर, सुरेखा शेटे, श्रीरंग उईके, आदी मंचावर उपस्थित होते.
आदिवासींनी समता बंधुत्व जोपासलेला असून आता आपल्या मुलांना शिक्षणाचे धडे देणे काळाची गरज आहे समाजाने आता एकजुटीने काम करत राहावे असे आवाहन मुकुंदा मेश्राम सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. तर आदिवासींनी आता मोर्चा आंदोलन शांत पद्धतीने न करता आपल्याला संविधान अधिकारासाठी बिरसा मुंडा सारखं शस्त्र हाती घेउन राज्यकर्त्यासोबत उलगुलान केल्याशिवाय न्याय मिळणारनाही आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याची काळाची गरज असल्याने उपरी गावातून व आदिासीबहुल भागातील युवक उच्च शिक्षण घावे असे प्रतिपादन प्रवीण गेडाम तालुका अध्यक्ष यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे सुद्धा आदिवासी समाजावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी महिला पुरुषांनी सहभाग घेतला ……