कोरेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला झाडाझुडपाचा वेढा… — दवाखाना परीसरात काडीकचऱ्याचे साम्राज्य… — कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने पशुधनावर उपचारासाठी अडचणी…

प्रितम जनबंधु

    संपादक 

आरमोरी :- तालुक्यातील कोरेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत मागील दहा वर्षापूर्वी बांधण्यात आली. दवाखाना बांधकामावर जवळपास ५० लाख रुपये खर्च करून सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. परंतु दवाखान्यात मुख्यालयी कुणीही कर्मचारी, राहत नसल्याने सध्या दवाखान्याला झाडाझुडपांनी वेढा घातला असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसुन येत आहे. 

               पशुवैद्यकीय दवाखान्यातील काही उपयोगीत काही साहित्यसुद्धा लंपास झाले आहेत. कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने पशुपालकाना पशुवर उपचार करण्यास अडचणीचा सामना करावा लागतो आहे. काही प्रसंगी वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक पशु मृत्युमुखी पडले आहेत याला मुख्यत्वेकरुन जबाबदार कोण? असा प्रश्न कोरेगाव वासियाना पडला आहे. 

             पशुवैद्यकीय दवाखान्यात कोणतेही कर्मचारी स्थाही राहत नाही. त्यामुळे दवाखान्याची बिकट अवस्था झाली. दवाखान्यातील साहित्य चोरीला गेल्याने दवाखाना उघड्यावर पडला असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसुन येत आहे. सोबतच या दवाखान्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने दवाखान्यात, तसेच बाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत. अशा परिस्थितीत काडीकचऱ्यातच दवाखान्यात पशुधनावर उपचार केले जात आहेत. यामुळेच पशुपालक यांचेकडून शासनावर रोष व्यक्त केल्या जात आहे.

                कोरेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना प्रथम श्रेणीत येतो. या दवाखान्या अंतर्गत २१ गावांचा समावेश आहे. पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, परिचर, आदी तीन कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. हे कर्मचारी स्थायी राहावे म्हणून सोयीसुविधायुक्त निवासस्थाने बांधण्यात आली आहेत परंतु येथे सुरुवातीपासूनच कोणतेही कर्मचारी राहत नाही शिवाय सध्या पशुवैद्यकीय दवाखाना अस्ताव्यस्त, झाडाझुडपाने वेढला गेला असुन समस्येच्या गर्तेत सापडला असल्याचे दिसुन येत आहे.

        याकडे संबधीत प्रशासनाने तातडीन लक्ष देऊन दवाखान्यात स्थानीक पशुवैद्यकीय अधिकारी याची नियुक्ती करावी, मुख्यालयी कर्मचारी नियुक्त करण्यात यावा, दवाखान्यातील झाडेझुडपे तोडली जाऊन दवाखान्याला परीसर श्वच्छ ठेवला जावा, तद्वतच पशुधनावर योग्य वेळी योग्य उपचार मिळावा, उपचाराअभावी जनावरे दगावली जाऊ नयेत, अशी रास्त मागणी कोरेगाव तथा परीसरातील पशुपालक यांचेकडून केली जात आहे.