युवराज डोंगरे
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
जिल्हयातील दर्यापूर येथील नायब तहसिलदार यांनी आपल्या कार्यक्षेत्राची हद्द सोडून दुसऱ्या जिल्ह्यात दोन ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करीत त्यांच्यावर येवदा पोलिस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे दाखल केले असल्या बाबतची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अमरावती तसेच उपविभागीय अधिकारी(महसूल),पोलिस अधिक्षक ग्रामिण यांच्याकडे प्रदीप लोडम,रुस्तमपूर,शुभम मानकर,भुईखेड,ता.दर्यापूर येथील रहिवासी असून दोघेही दि. 5 जानेवारीला रात्रो 10:15 वाजताच्या सुमारास म्हैसांग जि. अकोला येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याकरिता गेले होते.
ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरुन झाल्यावर ट्रॅक्टर ट्रॉली उभी करुन जेवन करण्यासाठी गेले होते.
तेवढ्यात 5 जणांसह MH 04,0057बोलेरो गाडी आली. त्यात दर्यापूरचे नायब तहसिलदार गाडेकर होते.
ट्रॅक्टरचालक असलेल्या प्रदीप लोडम व शुभम मानकर यांना तुम्ही अवैध रेतीची वाहतूक करीत आहात असे म्हणून खंडणीची मागणी करीत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.
नायब तहसिलदार यांना प्रदीप लोडम व शुभम मानकर यांनी आम्ही अवैध रेतीची वाहतूक करीत नाही सध्या कापूस वेचणीची लगबग असल्याने आम्ही कापसाच्या गाथोड्याचे भाडे मारीत असून ट्रॅक्टर मधील डिझेल संपल्याने आम्ही डिझेल भरण्यासाठी आलो होतो व जेवन करण्यासाठी जात आहोत अशी विनवणी केली.मात्र नायब तहसिलदार गाडेकर यांनी ऐकले नाही.
दि 6 जानेवारीला दुपारी 1 वाजताच्या सुमारास येवदा पोलिस स्टेशनला प्रदीप लोडम व शुभम मानकर विरुध्द कलम 353 गुन्हा दाखल केला
दोन्ही ट्रॅक्टर चालकांवर दर्यापूरच्या नायब तहसिलदार यांनी खोटा गुन्हा दाखल करीत अन्याय केला असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे असून नायब तहसिलदार गाडेकर यांनी दर्यापूर क्षेत्राचे कार्यक्षेत्र सोडून अकोला जिल्ह्यात कारवाई केली ती नियमात बसणारी नाही.
आपल्याला न्याय मिळावा व नायब तहसिलदार गाडेकर यांच्यावर कारवाई यासाठी तक्रारकर्ते प्रदीप लोडम व शुभम मानकर यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी(महसूल)व अमरावती जिल्हा पोलिस अधिक्षक ग्रामिण यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.