दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : महाराष्ट्रात रक्ताची कमतरता भासत असल्यामुळे सर्व जनतेला रक्तदान करण्याचे आव्हान कर्तव्य फौंडेशनच्या वतीने केले त्याच आव्हानाला प्रतिसाद म्हणून आळंदी येथील कर्तव्य फौंडेशनच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त साई मंगल कार्यालय,आळंदी येथे अकरा ते पाच या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात आळंदी परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेत १५० जणांनी रक्तदान केले.
कर्तव्य फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन साई मंगल कार्यालयाचे मालक शंकरराव येळवंडे यांनी केले तसेच यावेळी माजी नगरसेवक सचिन गिलबिले, दिनेश घुले, सामाजिक कार्यकर्ते निसार सय्यद, वारकरी महाराज मंडळी, तरुण वर्ग बहूसंख्येने उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात रक्तदान करून राष्ट्रहिताच्या कार्यात व गरीब, गरजू यांना रक्त रक्ताची कमतरता भासू नये म्हणून रकतदात्यांनी रक्तदान करूण दिनदुबळयांचे प्राण वाचवुन समाजाप्रतिनिष्ठा राखली त्याबद्दल कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे यांनी सर्वांचे आभार मानले.