शेतकऱ्यांना २४ तास विद्युत पुरवठा द्या.:- डॉ.सतिश वारजुकर.. — २४ तासाच्या आत शेतकऱ्यांना २४ तास विज पुरवठा न मिळाल्यास तीव्र रास्तारोको आंदोलन करणार..

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर:-

            चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ.सतिश वारजूकर यांनी शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेत, शेती ओलित करण्यासाठी शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावा या करिता चिमूर ते वरोरा महामार्गावरील रामदेगी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन आज केले.

        वरोरा तालुक्यातील येरखेडा व गिरोला,चिमूर तालुक्यातील सावरी,माकोना खानगांव,गुजगव्हान येथील शेतकऱ्यांसोबत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

 

          एकीकडे मोझाक या व्हायरसमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झाले तर दुसरीकडे शेतकऱ्यांना थ्री फेज वीजपुरवठा दिवसा केला जात नसल्याने शेतकरी पूर्ण पणे हवालदिल झाला आहे.कपाशीचे पीक देखील उन्हामुळे मरणागती होत असल्याचे दिसत आहे. सोबतच धान पीक देखील पाण्याअभावी नष्ट होण्याची शक्यता आहे.तेव्हा आजच्या स्थितीत शेतकऱ्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

        त्याकरिता रब्बी हंगामातील चना,गहू या पिकांना पाणी देणे सुध्दा गरजेचे असल्याने शेतकऱ्यांना रात्रोच्या वेळेस पिकाला पाणी करावे लागत आहे.तेव्हा येथील शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत असून,रात्रीला रानटी जनावरे,विषारी साप,विंचू अश्या प्राणघातक प्राण्याला तोंड देत जीव मुठीत धरून पानी करावे लागत आहे. 

          यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या सोई करिता २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवण्यात यावा.जर २४ तासाच्या आत शेतकऱ्याना २४ तास विज पुरवठा करू शकले नाही तर संपूर्ण शेतकरी परत रस्त्यावर उतरून दिवसभर रास्तारोको आंदोलन करू अशा इशारा ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक डॉ.सातिश वारजूकर,सर्व शेतकरी यांनी इशारा देत उपस्थित अभियंता सिंग यांना निवेदन दिले.

         या वेळी चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गजाजन बुटके,तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ.विजयजी गावंडे,जिल्हा परिषद माजी सभापती गुणवंत कारेकर,ग्रामपंचायत सरपंच सावरी लोकेश रामटेके,माजी सरपंच ठेपाले,मंगेश मेश्राम,गोलू रामटेके,आशिष खोब्रागडे, सौरभ बुटके, पंचम रामटेके,बंडू गायकवाड,संदीप माथनकर,पकढारी माथनकर,पंढरी माथनकर,नंदलाल शेंडे,ताराचंद पाटील, थकसेन पाटिल,रोशन खोब्रागडे,सुरेश निखाडे,व शेतकरी उपस्थित होते.