खल्लार/प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले ते मासाहेब जिजाऊ जयंतीच्या निमित्याने 3 जानेवारी ते 12 जानेवारी या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जातात.
” जागर सावित्रीचा _गौरव स्त्रीशक्तीचा” या उक्तीप्रमाणे दर्यापूर येथील इन्स्पायर द इन्स्टिट्यूट स्किल डेव्हलपमेंट च्या वतीने “रियल सुपर वुमन “हा पुरस्कार आदर्श प्राथमिक विद्यामंदिर, दर्यापूर या शाळेच्या शिक्षिका कु. नीलिमा महल्ले यांना प्रदान करण्यात आला आहे. संचालिका सौ. वृषाली नितीन टाले तसेच सहसंचालक नितीन दत्तात्रय टाले या उभयंताच्या प्रेरणेतून हा पुरस्कार विविध क्षेत्रातील स्त्री शक्तीचा गुणगौरव म्हणून दिला जातो. त्यामध्ये स्त्री आरोग्य अधिकारी, स्त्री शिक्षिका ,समाजसेविका तसेच गरीब परिस्थितीतून आपल्या दोन्ही मुलांना सैन्यामध्ये पाठवणाऱ्या सर्व क्षेत्रातील व्यक्तीप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रात “सुपर वुमन”सारख्या कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार इन्स्पायर इन्स्टिट्यूट च्या वतीने रविवार दिनांक 8/ 9 /2023 रोजी माहेश्वरी भवन दर्यापूर येथे प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून आमदार बळवंत वानखडे ,तहसिलदार योगेश देशमुख, पुनम पनपालीया, जेष्ठ पत्रकार गजानन देशमुख यांच्या उपस्थितीत कु. नीलिमा महाले यांना द रियल सुपर वुमन पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या शाळेतील कु. गजबे , सौ .डहाळे , सपकाळ आणि विशेषता मुख्याध्यापक श्री काळमेघ सर यांनी कौतुक केले आहे.