कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान,ता.०९ जानेवारी
हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे सोमवार (दि.९)जानेवारी रोजी फातिमा शेख यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शाळेचे संचालक मा.नरेंद्र वाघमारे आणि लायन्स क्लब अध्यक्ष मा.दिनानाथजी वर्मा यांच्या हस्ते फातिमा शेख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी मा.नरेंद्र वाघमारे साहेब यांनी फातिमा शेख यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले. त्यानंंतर मुख्याध्यापक कु.वंदना रामापुरे यांनी पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या बद्दल विद्यार्थांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन आयशा अंसारी यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत चांदेवार यांनी केले.
या प्रसंगी भास्कर सातपूते, हेमंत वंजारी, जयश्री पवार, मंदाकिनी रंगारी, अभिषेक मोहनकर, हेमंत वाघमारे, गणेश रामापुरे आणि समस्त शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.