कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी दिंनाक ९/१/२०२३
आमडी फाटा ते पारशिवणी ते सावनेर मार्गाचे नुतनी करण तीन वर्षे पूर्वी करुन सिमेंट रोड तयार करण्यात आला. पण या रस्त्याचे बांधकाम अत्यंत नियोजन शून्य व निकृष्ठ दर्जाचे झाल्यामुळे अल्पावधीतच रोडवर खड्डे पडले व या खड्यांच्या दुरुस्ती कडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्यामुळे अपघाताची आकडेवारी दिवसेन दिवस वाढत आहे. याच रोडच्या दुरुस्ती करिता व दिशादर्शक फलक लावले जावे यासाठी आज दिनांक ९ जानेवारी रोजी पारशिवनी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते गौरव पनवेलकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य आंदोलन करण्यात आले.
आमडी फाटा ते पारशिवणी व सावनेर पर्यंत सिमेंट रोड चे बांधकाम करून संबंधित कंपनीने रोडच्या किरकोळ दुरुस्ती कडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्यामुळे रोडवर जागोजागी जिवघेणे खड्डे पडले व या खड्यांच्या दुरुस्ती कडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्यामुळे अपघाताची आकडेवारी दिवसेन दिवस वाढत राहील्याने आतापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांचा नाहक बळी गेले तर अनेक लोकांना अपंगत्व आले. तरीही संबंधित कंपनीने दुरुस्ती कडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्यामुळे अखेर सामाजिक कार्यकर्ते गौरव पनवेलकर यांच्या नेतृत्वात पारशिवनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दिव्य आंदोलन करण्यात आले..
याप्रसंगी आंदोलन कत्यांनी निवेदन स्वीकारण्यांकरिता आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात. रोडवरील खड्डे तात्काळ बुजविण्यासाठी कार्य करा. रोडवर दिशादर्शक फलक लावले जावे. गावालगत कॅटाईज गतिरोधक लावा. पारशिवनी चौकात चारही बाजूंनी कॅटाईज व रंगीत दिशादर्शक लावा. सुरक्षेच्या दृष्टीने रोडवर दिशादर्शक फलक लावले जावे. व ईतर सुचना निवेदनाद्वारे दिलेल्या आहे.
आदोंलनात सहभागी पारशिवनी कराच्या मागण्या वर तात्काळ अंमलबजावणी केली नाही तर नागपूर येथील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा आंदोलन कत्यांनी निवेदनातून दिलेला आहे. आंदोलन स्थळी हजारो नागरिकांची उपस्थिती होती. या आंदोलनात सुधाकर मेंघर जिल्हा नियोजन समिती सदस्य. गौरव पनवेलकर. डॉ. प्रमोद भड. प्रतिक वैद्य. आदित्य वानखेडे. महेश खुबांळकर. ज्ञानेश्वर मेंघर. अशोक केळवदे.खाजगी वाहन चालकांसह सह पारशिवनी शहरातील जेष्ठ नागरिक व. युवक. युवती. मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन स्थळी पोलीस निरीक्षक राहूल सोनवणे यांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवली. आंदोलन स्थळी सबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी पोहचून त्यांनी निवेदन स्वीकारले व तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आस्वासन दिले.