मृत अर्भक नालीत सापडले.. — अर्भकाला नालीत फेकणाऱ्यां निर्दयी अज्ञात व्यक्तींचा भिसी पोलिसांकडून कसून शोध सुरु.

      रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

        जय वाघे

तालुका ग्रामीण प्रतिनिधी चिमूर..

            मृतावस्थेत असलेल्या एका नवजात अर्भकाला नालीत फेकून दिल्याची हृहद्रावक घटना काल बुधवारी (1 नोव्हेंबर 2023) ला सायंकाळी चारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा बोडदा गावातील हनुमान मंदिरा समोरील नालीत उघडकीस आली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

          आढळलेले नवजात अर्भक बालिका असून ते अर्भक तीन दिवसाचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.मात्र ते अर्भक गावातील नसल्याची माहिती जनमानसांच्या चर्चेतून कळते आहे.

            हाती आलेल्या माहितीनुसार,चिमूर तालुक्यातील बोडधा गावात आज बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास गावातील काही लोकांना हनुमान मंदिरा समोरील सांडपाणी साचलेल्या नालित नवजात अर्भक मृत्तावस्थेत आढळून आला.

           या घटनेची माहिती बोडधा गावात वाऱ्यासारखी पसरताच त्या अर्भकाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.लगेच अर्भका संबंधाने भिसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.पोलिसांची चम्मू घटनास्थळी दाखल झाली.

               घटना स्थळाचा पंचनामा करून पोलीसांनी नवजात अर्भकाला ताब्यात घेतले असता ते मृत्तावस्थेत होते.अर्भक बालिका असुन पोलीसांनी जन्म देणाऱ्या त्या निर्दयी महिलेचा शोध सुरू केला आहे.

            अर्भक आढळून आल्यानंतर ती गावातील कुण्यातरी महिलेचे असावे असा संशय प्रथमतः व्यक्त करण्यात आला होता,परंतु गावात कुणीच महिला गर्भवती नसल्याने ते अर्भक अन्य गावातील महिलेचा असावा असा संशय निर्माण केल्या जात आहे. 

              अज्ञात बाहेरील व्यक्तींनी नवजात अर्भक रात्रीच नालीत आणून टाकले असावे, अशीही चर्चा आहे.आढळून आलेले अर्भक ही बालिका असल्यामुळे तिला उघड्यावर फेकण्यात आले असावे,अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

         वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भिसी पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रमोद राऊत, उपनिरीक्षक सचिन जंगम,बिट जमादार अमोल नवघरे व इतर सहकारी,नवजात अर्भक फेकणाऱ्यांचा कसून शोध घेत आहेत.