छत्रपती संभाजीनगर :- EVM द्वारे आमच्या मताच्या अधिकाराचे झालेले हणन,हा आमच्यावर,संविधानावर आणि लोकशाहीवर झालेला संविधानविरोधी शक्तीचा घणाघात आहे.हा घणाघात परतवून लावण्यासाठी EVM हटाव बॅलेट पेपर लाव च्या मागणीसाठी रस्त्यावरची ही जनतेची निर्णायक लढाई.
या लढाईत हजारोच्या संख्येने सामील होऊन लोकशाही, संविधान आणि मताच्या अधिकाराचे रक्षण करूया.
मारकडवाडी गावकऱ्यांच्या EVM चे खरे स्वरूप बाहेर काढण्याच्या प्रयत्नाला पोलीस प्रशासनाने हाणून पाडले. त्याचा निषेध करण्यासाठी.
तसेच डॉ.बाबा आढाव यांच्या वयाच्या 95 व्या वर्षी उपोषणास म्हणजेच त्यांच्या आजन्म चळवळीस पाठिंबा म्हणून,त्याचप्रमाणे आमच्या जिवापेक्षाही मोलाचा असलेला मताचा अधिकार हिरावून घेणाऱ्या EVM ला आणि तीच्यावर धांदली करुन विशिष्ट राजकीय पक्षाचा लाभ मिळवून देणाऱ्या मुख्य निवडणूक आयोगाचा, तसेच EVM ला हटविण्यासाठी जनतेची तीव्र मागणी असून सुद्धा तीला हटवीण्याचे आदेश न देणारे मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा.राष्ट्रपती यांचाही निषेध करण्यासाठी,या क्रांती मोर्चाचे आयोजन.
सोमवार,दिनांक ९ डिसेंबर २०२४..
— वेळ सकाळी :- 11•00 वाजता.
— स्थळ :- क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय…
आयोजक
जागृत नागरी कृती समिती
छत्रपती संभाजी नगर
*****
संपर्क ….
(1) प्रा.भारत सिरसाठ सर ( 9421308101)
(2) प्रा. मच्छिन्द्र गोर्डे सर -9422290123
(3) जितेंद्र भवरे ( पत्रकार )
9421316074
(4) अनंत केरबाजी भवरे ( संविधान विश्लेषक )
7875452689
*****