विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे समाजाने पाईक व्हावे.:- अंकुश भाऊराव रहाटे..

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

     महामानव,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे समाजाने पाईक होणे गरजेचे आहे असे मत मोचर्डा ग्रामपंचायतीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ता अंकुश भाऊराव रहाटे यांनी व्यक्त केले.

            ग्रामपंचायत कार्यालय मोचर्डा व जिल्हा परिषद मराठी शाळा येथे महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले.

          यावेळी ग्रामपंचायत मोचर्डाच्या सरपंच सौ.शुभांगीताई मदन पाटिल गावंडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पमाला व पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले.

           त्यानंतर जिल्हा परिषद मराठी शाळा मोचर्डा येथे महामानवास अभिवादन करून शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन पाटावर आपले विचार व्यक्त केले व अभिवादन केले…

           या अभिवादन कार्यक्रमास ग्रामपंचायत मोचर्डा सरपंच सौ. शुभांगीताई मदन पाटील गावंडे,उपसरपंच ऋषीकेश गावंडे,सदस्य अंकुश भाऊराव रहाटे,अविनाश भाऊ पर्वतकर,ग्रामसेवक गुडधे,जिल्हा परिषद मराठी शाळा मोचर्डा मुख्याध्यापिका सौ.भडांगे मॅडम,शिक्षक दत्तात्रय भाऊराव रहाटे व प्रतिष्ठित नागरिक अविनाश गावंडे,ग्रामपंचायत कर्मचारी संजय तिडके,शाळा व्यवस्थापण समिति उपाध्यक्ष सौ. वर्षाताई पर्वतकर व सुवर्णा धुरंधर,अरुणा पर्वतकर,रुख्माबाई गावंडे आधी उपास्थित होते.

         महामानवास विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणाने आदरांजली वाहिली.यामध्ये कु.अनुश्री गजानन पर्वतकर,कु.आस्था देवानंद पर्वतकर,कु.आचाल राहुल सुलताने,कु.शिल्पा संजय पर्वतकर यांचा सहभाग होता.

        “लोकांसाठी तो सूर्य मावळला आहे,पण तो सूर्य मावळने कधीच शक्य नाही.त्या सूर्याने त्याच्या कर्तुत्वाने अत्याचार,अन्याय,जातिवाद,भेदभाव सारख्या भीषण अंधाराला कायमच दूर केलं.भीम प्रज्ञासूर्य त्या अंधाराला दूर ठेवायला सदा तेवत राहणार असे अभिवादनपर विचार शिक्षक दत्तात्रय भाऊराव रहाटे ह्यांनी व्यक्त केले…