दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रे यांसह राज्यातील सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांचा परिसर १०० टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावीत, पंढरपूर येथील चंद्रभागा अन् आळंदी येथील इंद्रांयणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, सर्व तीर्थक्षेत्रे, मंदिर येथे ‘वस्रसंहिता (ड्रेसकोड) लागू करावे, अशी एकमुखी मागणी वारकरी अधिवेशनात करण्यात आली.
यावेळी अविनाश धर्माधिकारी, अमृताश्रम स्वामी, शाम महाराज राठोड, अक्षय महाराज भोसले, भगवान महाराज कोकरे, सुनील घनवट, प्रकाश जवंजाळ, पराग गोखले, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे, बापू महाराज रावकर, अर्जुन महाराज रासकर, रामचंद्र महाराज पेनोरे, निरंजन महाराज कोठेकर उपस्थित होते.
वारकर्यांच्या विविध मागण्यांसाठी ९ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे १७ व्या वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हा निर्धार व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. या प्रसंगी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.