नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली : ग्रामपंचायत निवडणुक २०२२ या कार्यक्रमात ( ता.०७.) उमेदवारांची चिन्हे वाटप करण्यात आले असून ( ता.०८.) ला तहसिल कार्यालय साकोली येथे सर्व उमेदवारांनी येत अखेरची पडताळणी केली व आपल्या विविध निवडणूक बोधचिन्हांसह हैंडबिल, बैनर असे प्रचारयुक्त साहित्यांची छपाई प्रिंटीग प्रेसमधे करून शुक्रवार ०९ पासून गावात प्रचाराचा नारळ फोडला गेला. 

    आज ( ता.०९.) सकाळी सर्वप्रथम साकोली तालुक्यातील मुख्य शेतकरी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या बोदरा ग्रामपंचायत निवडणुकीत श्री दूर्गा मंदिर येथे स.०८ वा. उमेदवार व मान्यवरांनी येऊन पूजा अर्चना करीत प्रचाराचा नारळ फोडला गेला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नेपाल रंगारी, साकोली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष पवनकुमार शेंडे, जिल्हा परिषद सदस्या वनिता डोये, ज्येष्ठ नागरिक चंद्रभान कापगते, सामाजिक कार्यकर्ता निलेश कापगते, दिलीप कापगते, सरपंचा उमेदवार लेखा कापगते, सदस्य उमेदवार विद्यासागर तिरपूडे, टोलीराम मडावी, सुषमा चचाने, शिशुपाल मेश्राम, जिजा गहाणे, शांता पूरामकर, मारोती पूरामकर, सारीका मेश्राम, सविता ठाकरे यांसह जनशक्ती युवा परीवर्तन पॅनलचे कार्यकर्ते आणि श्री दूर्गा मंदिर परिसरातील महिला पुरूष व नागरिक उपस्थित होते. 

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News