नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली -स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत ,जिल्हा परिषद निवडणुक- 2022 होणाऱ्या निवडणुकांचे मानधन कार्य कर्तव्यावर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर व इतर कर्मचाऱ्यांना कर्तव्याच्या दिवशीच रोखीने तात्काळ देण्यात यावे. तसेच यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा निवडणुकीचे मानधन कर्तव्यावर असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर व इतर कर्मचाऱ्यांना मिळाले नाही, ते मानधन त्वरित द्यावे. याकरिता शासनमान्य शिक्षक भारती संघटना तालुका साकोली च्या वतीने तहसीलदार रमेश कुंभारे यांना निवेदन देण्यात आले, यावेळी शिक्षक भारती संघटनेचे तालुकाध्यक्ष नंदकुमार क्षीरसागर ,तालुका कार्यवाह धनंजय तुमसरे, उपाध्यक्ष धनराज मसराम, रवींद्र कापगते, आर सी बडोले, आर.व्ही.दिघोरे ,डी आर देशमुख, मांढाळकर, प्रशांत कापगते,डी टी हेमने व इतर बहुसंख्येने शिक्षक शिक्षकेतर व इतर कर्मचारी उपस्थित होते.