प्रतिनिधी//प्रलय सहारे
वैरागड : – येथील नव आदर्श मच्छीपालन सहकारी संस्था मार्फत घेण्यात आलेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रमेश दयाराम दुमाणे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
तलावात मच्छी पालन करून मच्छी व्यवसाय करणारे वैरागड येथील ढिवर समाज शासन अंतर्गत नव आदर्श मच्छीपालन सहकारी संस्था १९६२ पासून कार्यरत आहे. यात एकूण ११ संचालक पदभार सांभाळत असतात. दर पाच वर्षानंतर कार्यरत संचालक नवीन अध्यक्ष नेमतात. मागील अध्यक्ष रोहिदास दुमाणे यांचे कार्यकाळ संपल्यानंतर दि. ०८ डिसें. रोजी संचालक रमेश धनकर, शालिक खामदेवे, ईश्वर दुमाणे, सुखराम भरद्वार, नलेंद्र मानकर, पांडुरंग गेडाम, मनिश्र्वर कांबळे, राजेंद्र कांबळे, छाया संतोष कांबळे आणि गिता टिकाराम धनकर यांनी रमेश दुमाणे यांना बिनविरोध अध्यक्ष निवडून दिले.
नव आदर्श मछिपालन सहकारी संस्था अध्याशी यू. पी. मेश्राम यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. संस्था सचिव गजानन धनकर यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.