लाखनी निसर्गमहोत्सव व वन्यजीव सप्ताह निमित्ताने… — ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व वनविभागातर्फे लाखनी निसर्गमहोत्सवाच्या निमित्ताने भव्य “ग्रीन सायकल रॅली”… — ‘नेचर पार्क’ लाखनी ते गडेगाव डेपो 15 किमीच्या सायकल रॅलीचे आयोजन… — मानव सेवा मंडळ,गुरुकुल आयटीआय व समर्थ विद्यालयाच्या हरित सेनेचा सहभाग…

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

लाखनी:-

        ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व वनविभाग लाखनी यांच्या सयूंक्त विद्यमाने लाखनीचा ‘निसर्गमहोत्सव’ व वन्यजीव सप्ताह 2023 निमित्ताने लाखनी बसस्थानकावर ग्रीनफ्रेंड्सने तयार केलेल्या ‘नेचर पार्क’ पासून गडेगाव डेपो व पुन्हा परत ‘नेचर पार्क’ अशी एकूण 15 किमीची ‘भव्य ग्रीन सायकल रॅली’चे आयोजन वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने करण्यात आले.सायकल रॅलीला लाखनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे,मुरमाडीचे सरपंच शेषराव वंजारी, सावरीचे सरपंच सचिन बागडे,नगरसेवक संदीप भांडारकर, महेश आकरे,मानव सेवा मंडळाचे ऍड. शफी लद्धांनी,अशोका बिल्डकाँनचे नितेश नगरकर, समर्थ विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अनिल बडवाईक,गुरुकुलआयटीआय प्राचार्य खुशालचंद्र मेशराम, वनविभाग लाखनीचे क्षेत्राधिकारी सुरज गोखले इत्यादींनी हिरवी झेंडी दाखवून 15 किमीच्या “भव्य ग्रीन सायकल रॅली”ची सुरवात केली.

         तत्पूर्वी ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर प्रा. अशोक गायधने यांनी मागील 18 वर्षांपासून ग्रीनफ्रेंडस नेचर क्लबतर्फे अखंडपणे आयोजित “लाखनी निसर्गमहोत्सव व वन्यजीव सप्ताह 2023” निमित्ताने “भव्य ग्रीन सायकल रॅली”चे आयोजन मागील 6 वर्षांपासून करण्यामागचा उद्देश समजावून सांगितला व आजच्या काळात पर्यावरण टिकविण्यासाठी तसेच आरोग्य राखण्यासाठी सायकलचे महत्व सोदाहरणासहित विशद केले.त्याचबरोबर पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी यावेळी शुभेच्छा दिल्यानंतर नेचर पार्कवर त्यांच्या वाढदिवसाच्या व वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी सायकल रॅलीला थोडक्यात संबोधन केले व सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या.यानंतर ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व मानव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वच सायकलस्वारांना ‘ग्रीन स्टिकर्स’,ग्रीन पर्यावरण घोषवाक्ययाचे फलक’,ग्रीन झेंडी इत्यादी साहित्य मानव सेवा मंडळाचे ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे,ऍड. शफी लद्धांनी यांचे हस्ते वितरित करण्यात आले. ‘ ग्रीन टी शर्ट’ व ‘ग्रीन स्टिकर्स’ तसेच ‘ग्रीन घोषवाक्ये फलके’ यामुळे सायकल रॅलीतील वातावरण पुर्णतः ग्रीनरी व हरितमय झाले होते व सर्वत्र आकर्षणाचा केंद्रबिंदू झाले होते.

        ग्रीन सायकल रॅलीने मुख्य महामार्ग वरून प्रस्थान केल्यानंतर विविध पर्यावरण संवर्धन तसेच आगामी नवरात्र, दसरा, दिवाळी सण पर्यावरणपुरक साजरे करण्यासाठी अनेक घोषणा देत वनविभाग गडेगाव डेपोच्या कार्यालयात अर्ध्या तासानंतर पोहोचले. त्याठिकाणी छोटेखानी वन्यजीव सप्ताह कार्यक्रम वनक्षेत्राधिकारी सुरज गोखले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन “लाखनी निसर्गमहोत्सव” 2023 व “वन्यजीव सप्ताहा-2023च्या निमित्ताने उपस्थितांना ग्रीनफ्रेंड्सचे प्रा. अशोक गायधने, वनक्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले ,त्रिवेणी गायधने, शिवलाल निखाडे इत्यादींनी मार्गदर्शन केले.अल्पोआहारानंतर भव्य ‘ग्रीन सायकल’ रॅली पुन्हा 15 किमी सायकल चालविल्यावर पुन्हा ‘नेचर पार्क’वर पोहोचली. यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे अध्यक्ष अशोक वैद्य ,ग्रीनफ्रेंड्सचे पदाधिकारी पंकज भिवगडे, विवेक बावनकुळे, मयुर गायधने,युवराज बोबडे,बाळकृष्ण मेश्राम,नितीन निर्वाण , धनंजय कापगते, गोविंद धुर्वे यांनी तसेच मानव सेवा मंडळाचे अशोक नंदेश्वर, दिलीप निर्वाण,मंगल खांडेकर, गुरुकुल आयटीआयचे प्राचार्य खुशालचंद्र मेशराम इत्यादींनी सर्व 100 च्या वर रॅलीत सहभागी सायकलस्वारांना टाळ्याच्या गजरात ‘भव्य ग्रीन सायकल रॅली’चे ग्रीन सहभाग प्रमाणपत्र दिले.

       संपुर्ण रॅलीचे बहारदार संचालन आय टी आय चे निदेशक चक्रधर पाखमोडे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक वैद्य यांनी केले. रॅलीच्या यशस्वितेकरिता पोलीस स्टेशन लाखनीचे वाहतूक पथक संपुर्ण सायकल रॅलीत देखरेख करीत होते. त्याचबरोबर समर्थ शाळेचे मुख्याध्यापक अनिल बडवाईक, लांडगे शिक्षक,राष्ट्रीय हरित सेनाचे शिक्षक गद्रे शिक्षक,राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाचे हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. मनोज आगलावे,मुबंई इन्स्पेक्टर नेताराम मस्के,वनौषधी शेती पुरस्कर्ते इंजि. राजेश गायधनी,वन क्षेत्रसहाय्यक उइके,वनपाल दिघोरे,सर्व वनरक्षक वनकर्मचारी त्रिवेणी गायधने,एम एल शहारे, आरती रंगारी,उर्वेशी वंजारी,चवळे, कोदाने, नितीन उशीर,भराडे, कावळे, बडोले,तुपट, बागडे, तसेच मानव सेवा मंडळाच्या 30 ज्येष्ठ सदस्यांनी त्याचबरोबर समर्थ शाळेच्या राष्ट्रीय हरित सेनेचे 23 विद्यार्थी, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेनेचे 5 विद्यार्थीनी,गुरुकुल आयटीआयचे 10 विद्यार्थी व 4 निदेशक, वनविभाग लाखनीचे 12 वनकर्मचारी इत्यादींनी सायकल रॅलीत सहभाग नोंदवून अथक परीश्रम घेतले.