युवराज डोंगरे/खल्लार
छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगाव पूर्णा येथे लिंगभाव समानता या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये अल्पवयीन प्रेम मातृत्व मानवतावादी दृष्टिकोन,प्रेम लैंगिकता, लैंगिकता मानवी वाहतूक या विषयावर माननीय रजिया सुलताना यांचे चर्चासत्र संपन्न झाले. त्यांनी आपल्या चरित्रामध्ये विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्नांना उत्तरे देत विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करून मानवी जीवनाला आकार द्यावा तसेच चौफेर दृष्टी ठेवून खूप शिका व स्वतःचे एक जग तयार करा आचार विचार व उच्चार यामध्ये समानता असली पाहिजे प्रेमामध्ये गांभीर्य असून आयुष्याचा शोध घेतला पाहिजे. भरपूर वाचन करून लिखाण केले पाहिजे त्यामुळे माणसाचे मन व्यक्त होते.इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे चर्चा करून दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. भारत कल्याणकर होते तसेच या कार्यक्रमाचे आयोजन इतिहास व समाजशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संचालन कु. किरण नांदणे प्रास्ताविक डॉ. प्रवीण सदार, तसेच आभार प्रदर्शन कु. महेक शेख यांनी केले . या कार्यक्रमासाठी डॉ. रविंद्र इचे, डॉ. आशिष काळे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.