नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : भारतीय जीवन विमा निगम साकोली शाखेतील प्रत्येक गावागावांत जीवन विम्यातून जनतेचे पुढील भविष्यासाठी जमाठेवेची माहिती देत अग्रेसर असणारे रोशन कापगते यांनी मागील दोन वर्षात साकोली शाखेत अतिशय उल्लेखनीय कार्य केले असून त्यांची प्रत्यक्षात भेट घेण्यासाठी व त्याचे अभिनंदन करण्यासाठी दि. ८ डिसेंबर २०२२ ला साकोली शाखेचे सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे यांनी स्वतः सानगडी येथील कुशल अभिकर्ता रोशन कापगते यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. तेथे सहायक शाखाधिकारींचे स्वागत करीत क्षेत्रातील गावागावांत जीवन विमाधारकांबाबद माहिती देण्यात आली. याप्रसंगी किशोर डोंगरे यांनी कापगते यांना एल आय सी क्षेत्रातील विमा ग्राहक सेवेत जास्तीत जास्त प्रगती कशा प्रकारे करता येईल याविषयी मोलाचा सल्ला दिला. साकोली शाखेतील सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे हे नवीन अभिकर्त्यांना आपल्या व्यवसायात कशा प्रकारची प्रगती करता येईल व एल आय सी साकोली शाखेचा व्यवसाय कशा प्रकारे वाढविता येईल याकडे विशेष लक्ष देतात व त्याप्रमाणे नेहमी प्रयत्न करीत असतात. त्यांच्या या भेटीमुळे अभिकर्त्याचा उत्साह वाढण्यास मदत होत आहे. खऱ्या अर्थाने आज विमा क्षेत्राचे भविष्य अभिकर्ता व अधिकारी या दोन व्यक्तीच्या एकत्र येऊन कार्य करण्यावर अवलंबून आहे त्या दिशेने एल आय सी साकोली शाखेचे सहायक शाखाधिकारी किशोर डोंगरे हे कार्य करीत असून जास्तीत जास्त प्रत्येक गावागावांत गोरगरीबांच्या पुढील भविष्यासाठी आर्थिक पूंजी कशी आतापासून जमा करण्यात ग्रामिण जनतेला याप्रकारे भविष्यासाठी बचतीची ओढ लागावी याकरीता प्रयत्नशिल आहेत.